विसर्जन मिरवणुकीवर ‘सीसीटीव्हीं’ची नजर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

सातारा - अनंत चतुर्दशीदिवशी (मंगळवारी) होणारे गणेश विसर्जन निर्विघ्न पार पडावे यासाठी विसर्जन तळ्याभोवती लाइफ गार्ड, क्रेन, सुरक्षा कठड्यांची उपाययोजना करण्यात आली आहे. सायंकाळी साडेचार वाजता सुरू होणाऱ्या मुख्य विसर्जन मिरवणुकीसह विसर्जन स्थळांवर सुमारे ५० ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ यांची नजर राहणार आहे. 

चांदणी चौकातून पालिकेच्या गणेशमूर्तीच्या आरतीने सायंकाळी साडेचार वाजता विसर्जन मिरवणुकीस सुरवात होईल. तेथून मोती चौक, कमानी हौद, शेटे चौक, ५०१ पाटीमार्गे, मोती चौक व तेथून प्रतापगंज पेठेतून राधिका चौकमार्गे प्रतापसिंह शेती फार्म असा मुख्य विसर्जन मिरवणुकीचा मार्ग राहणार आहे. शहर आणि शाहूपुरी या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत हा विसर्जन मार्ग येतो. त्यामुळे दोन्ही पोलिस ठाण्यांच्या वतीने सुमारे ३० व पालिकेने २४ सीसीटीव्ही कॅमेरे या मिरवणूक मार्गावर लावले आहेत.  विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या सूचनेनुसार यंदाच्या मिरवणुकीत आवाजाची पातळी थोडी खालचीच राहील, याची काळजी घेतली जाणार आहे.

सातारा विसर्जन ठिकाणे
प्रतापसिंह शेती शाळा परिसर
पालिकेचा पोहण्याचा तलाव
गोडोली नियोजित आयुर्वेदिक गार्डन
हुतात्मा स्मारक
सदरबझार दगडी शाळा
विसर्जनस्थळी निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

कऱ्हाड तयारी...
शहर, मलकापूरच्या विसर्जन मिरवणुकांवर ४२ सीसीटीव्हींचा वॉच
अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्ताची आखणी 
दोन पोलिस उपअधीक्षक, १५ अधिकाऱ्यांसह ४०० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त 
राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तर शंभर गृहरक्षक दलाचे जवान तैनात 
फिरत्या वीस पथकांची नेमणूक 
आठ सेक्‍टरद्वारे वीस कर्मचाऱ्यांचा मिरवणुकीद्वारे वॉच
चार कॅमेरे, तीन ध्वनी तपासणी यंत्रांद्वारे राहणार लक्ष

Web Title: satara news cctv watch on visarjan rally