साताऱ्यातील पाच रस्ते होणार सिमेंट कॉंक्रिटचे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

सातारा - नव्या वर्षांत साताऱ्यातील कर्मवीर पथ व राजपथासह पाच रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे करण्याचा संकल्प पालिकेने केला आहे. नगरोत्थान योजनेतून राज्य शासनाच्या मदतीने पालिकेने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नियोजन केले आहे. पालिकेच्या गुरुवारच्या (ता. 11) सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय होणार आहे. 

सातारा - नव्या वर्षांत साताऱ्यातील कर्मवीर पथ व राजपथासह पाच रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे करण्याचा संकल्प पालिकेने केला आहे. नगरोत्थान योजनेतून राज्य शासनाच्या मदतीने पालिकेने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नियोजन केले आहे. पालिकेच्या गुरुवारच्या (ता. 11) सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय होणार आहे. 

कर्मवीर पथ, राजपथ, गणतपराव तपासे मार्ग, भूविकास बॅंक ते जुना आरटीओ चौक व जिल्हा परिषद कॉर्नर ते कॅनॉलमार्गे जरंडेश्‍वर नाका हे पाच रस्ते नियोजित प्रस्तावात घेण्यात आले आहेत. कर्मवीर पथ, राजपथ व गणपतराव तपासे पथ हे साताऱ्यातील प्रमुख तीन रस्ते आहेत. शहरातील सर्वाधिक वाहतूक या तीन रस्त्यांवरून होते. यातील दोन रस्त्यांभोवती दाट लोकवस्ती आहे. अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या पायथ्याला शहर वसल्यामुळे येथील रस्ते तीव्र उताराचे आहेत. पावसाचे पाणी व इतर पाणी रस्त्यांवरून वाहिल्याने रस्ते खराब होण्याचे प्रमाण मोठे आहे. दोन्ही रस्त्यांची लांबी अडीच ते तीन किलोमीटर इतकी आहे. 

भूविकास बॅंक ते जुना आरटीओ ऑफिस या रस्त्यावरून महामार्गाकडे जाणाऱ्या बहुतांश वाहनांची वाहतूक चालते. शासकीय विश्रामगृहमार्गे सदरबझारमधून जरंडेश्‍वर नाक्‍याकडे जाणारा रस्ता हाही प्रमुख मार्ग आहे. वारंवार खराब होणाऱ्या रस्त्यांवर निधीअभावी डांबरीकरणासाठी खर्च करणे पालिकेला शक्‍य होत नाही. परिणामी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गैरसोईंना तोंड द्यावे लागते. यावर मार्ग म्हणून हे रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे करण्याचा प्रस्ताव पुढे आला. नगरोत्थान योजनेतून सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. 

""खासदार उदयनराजे भोसले यांनी सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्यांचा प्रस्ताव तयार करून शासनास पाठविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. नगरोत्थान योजनेतून निधी मंजूर झाल्यानंतर या रस्त्यांची कामे हाती घेण्यात येतील'' 
- मनोज शेंडे सभापती, सार्वजनिक बांधकाम 

Web Title: satara news cement road