महसूल मंत्र्यांच्या बनावटच्या बॉम्बने शेतकरी हवालदील

हेमंत पवार
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

बनावटमध्ये कोणकोण याचीच मोठी उत्सुकता; यादी जाहीर करण्याची मागणी

बनावटमध्ये कोणकोण याचीच मोठी उत्सुकता; यादी जाहीर करण्याची मागणी

कऱ्हाड (सातारा): सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची कार्यवाही सध्या अंतीम टप्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी तीनच दिवस उरल्याने शेतकऱ्यांची महाईसेवा केंद्राकडे झुंबड उडाली आहे. अनेक शेतकरी अजुनही अर्ज भरण्यापासुन वंचीत असल्याने मुदतवाढ द्यावी लागेल अशी स्थिती आहे. अशातच महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अर्ज दाखल केलेल्यापैकी १० लाख शेतकरी बनावट असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दाखल केलेल्या अर्जामधील शेतकऱ्यांना आपले नाव बनावट शेतकऱ्यांच्या यादीत आहे का? याची धास्ती लागली आहे. महसुलमंत्र्यांच्या विधानाने शेतकरी हवादील झाले असून अशा बनावट शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

कर्जमाफीसाठी झालेल्या अनेक आंदोलनामुळे आणी आलेल्या दबावामुळे सरकारला अखेर कर्जमाफी जाहीर करावी लागली. सरकारने कर्जमाफी देण्यासाठी ऑनलाईन अर्जाची अट्ट घातली आहे. त्यातच ऑनलाईनचा सर्व्हर सारखा डाऊन होत असल्याने शेतकरी अक्षरशः वैतागले होते. तरीही शेतकरी दांम्पत्यांनी गेल्या दोन महिन्यापासुन अर्ज भरण्याच्या ठिकाणी रांगेत उभे राहुन अर्ज भरले आहेत. मात्र तरी अजुनही बरेच शेतकरी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ताटकळत असल्याचे दिसत आहे. अर्ज भरण्यासाठी केवळ तीनच दिवस बाकी राहिले आहेत. असे असातनाही सर्व्हरचा सारखा घोटाळा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना मुदतीत आपला अर्ज भरला जाणार का नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशीही मागणी प्रगतशील शेतकरी निलेश भोसले यांनी केली आहे.  

एकीकडे हे चित्र असतानाच ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यातील १० लाख शेतकरी बनावट असल्याचा गौप्यस्फोट महसुलमंत्री श्री. पाटील यांनी काल कोल्हापूर येथे केला. त्याचबरोबर जे ८० लाख कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर ऑक्टोंरबर अखेरपर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, महसूलमंत्र्यांनी टाकलेल्या बनावट शेतकऱ्यांच्या बॉम्बने ज्यांनी अर्ज भरले आहेत ते शेतकरी संभ्रमात आहेत. सध्या गावोगावी बनावट शेतकऱ्यांचीच चर्चा सुरु आहे. त्यातील जे बनावट शेतकरी आहेत ते हवालदील झाले आहेत शिवाय ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. मात्र, त्यांना आपले नाव बनावटच्या यादीत आहे की नाही याबाबत उत्सुकता लागुन राहिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा बनावट शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी केली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
वैचारिक मतभेदांचे बळी
स्वातंत्र्याच्या सत्तरीतही या गावाला पक्का रस्ता नाहीच !
मदतीचा नव्हे... खरोखरचा हात
गणपती मांस खाताना दाखविल्याने भारताकडून तक्रार
कल्याण-डोंबिवली मनपाने श्वेतपत्रिका काढावी : मनसेची मागणी
पत्नी व मुलांच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
साहित्य संमेलन धार्मिक आश्रमात नकोच : रामदास फुटाणे
बिनधास्त करा पितृपक्षात खरेदी
पाच तासांनंतर कुटुंबीयांना मृत्यूची माहिती
राज्यात तात्पुरते भारनियमन; वीजग्राहकांना सहकार्याचे आवाहन
दिल्ली : अस्खलित इंग्रजीत बोलला म्हणून तरुणास मारहाण

Web Title: satara news chandrakant patil statement and farmer