‘मुख्यमंत्री ग्रामसडक’मधून ६४ कोटींचे रस्ते

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

सातारा - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यातून जिल्ह्यात २२ रस्ते होणार असून, त्यासाठी ६३ कोटी ७९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्याबाबत लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

सातारा - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यातून जिल्ह्यात २२ रस्ते होणार असून, त्यासाठी ६३ कोटी ७९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्याबाबत लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवरील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून विविध रस्त्यांची कामे केली जात आहेत. त्यामुळे वाड्यावस्त्या मोठ्या गावांशी जोडल्या जात असून, दळवळणाची साधने उपलब्ध होत आहेत. चालू आर्थिक वर्षात २२ रस्त्यांच्या कामांसाठी पुरेसा निधी प्राप्त झाला असल्याने ही कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. तसेच ग्रामसडक योजना विभागामार्फत त्याची निविदा प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

महाबळेश्‍वरमधील झोळाची खिंड ते जाधववस्ती (मांघर) रस्त्यासाठी चार कोटी १९ लाख, जावळीतील दापवडी ते आंबेघर तर्फ कुडाळ रस्त्यासाठी सहा कोटी दोन लाख, वाईतील चोराचीवाडी (आनंदपूर) रस्त्यासाठी एक कोटी ६६ लाख, खंडाळ्यातील राष्ट्रीय महामार्ग ते नायगाव रस्त्यासाठी एक कोटी ८२ लाख, अंदोरी ते रुई रस्त्यास एक कोटी ६६ लाख, माणमधील आंधळी ते राज्य मार्ग १३९ रस्त्यासाठी तीन कोटी १७ लाख, राज्य मार्ग ११७ ते शेरेवाडी रस्त्यास तीन कोटी ४८ लाख, मलवडी ते शिरवली रस्त्यास पाच कोटी ६९ लाख, कोरेगावमधील राज्यमार्ग ११७ ते घिगेवाडी रस्त्यास चार कोटी ६३ लाख, किन्हई ते नलवडेवाडी रस्त्यास तीन कोटी ४७ लाख, पाटणमधील जिल्हा मार्ग ते गारवडे रस्त्यास ८८ लाख, दुसाळे रस्त्यास एक कोटी ५६ लाख, मोरगिरी ते आंब्रग रस्त्यास एक कोटी ९८ लाख, फलटणमधील ढवळपाटी ते वेळोशी रस्त्यास पाच कोटी ९१, केडगाव ते अनपटवाडी रस्त्यास दोन कोटी ७३ लाख, खटावमधील वडूज ते डाळमोडी रस्त्यास दोन कोटी ८० लाख, वडूज ते गोसाव्याचीवाडी-औंध रस्त्यास दोन कोटी ६४ लाख, कऱ्हाडमधील यशवंतनगर ते अंतवडी रस्त्यास दोन कोटी ४१ लाख, पाटणमधील वज्ररोशी ते चिंचेवाडी रस्त्यास एक कोटी सहा लाख, कंकवडी ते कडववाडी रस्त्यास दोन कोटी चार लाख, उरूल ते बोडकेवाडी रस्त्यास एक कोटी ४७ लाख, मारुल तर्फ पाटण ते वाजेगाव रस्त्यास दोन कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पाच वर्षे या रस्त्यांची नियमित देखभाल व दुरुस्ती करायची असून, त्यासाठी तीन  कोटी ६५ लाख ७७ हजारांची रक्‍कम मंजूर आहे. त्याबाबतचे आदेश उपसचिव आर. ए. नागरगोजे यांनी काढले आहेत.

मंजूर रस्ते     २२
लांबी :     ११० किलोमीटर
कामाची रक्‍कम :     ६३.७९ कोटी
देखभाल निधी :     ३.६५ कोटी

Web Title: satara news chief minister rural road