परिसर स्वच्छतेद्वारे संदेश सेवेचा...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

सातारा - सकाळच्या प्रसन्न वातावरणात, कोवळी उनं अंगावर घेत त्यांनी आपल्या हातात झाडू घेतले. शाळेच्या पायरीपासून गावात सर्वत्र त्यांनी कचरा गोळा करत स्वच्छता केली. उडणारी धूळ आणि अस्वच्छतेला न जुमानता त्यांनी परिसर चकाचक करून आज करंजे येथील श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आगळी आदरांजली वाहिली. कृतिशील उपक्रम राबवून ‘स्वच्छता ही सेवा’ हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

सातारा - सकाळच्या प्रसन्न वातावरणात, कोवळी उनं अंगावर घेत त्यांनी आपल्या हातात झाडू घेतले. शाळेच्या पायरीपासून गावात सर्वत्र त्यांनी कचरा गोळा करत स्वच्छता केली. उडणारी धूळ आणि अस्वच्छतेला न जुमानता त्यांनी परिसर चकाचक करून आज करंजे येथील श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आगळी आदरांजली वाहिली. कृतिशील उपक्रम राबवून ‘स्वच्छता ही सेवा’ हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने महास्वच्छता मोहीम उपक्रम राबविण्यात आला. ‘सकाळ’ने या उपक्रमात सहभाग घेतला. या महास्वच्छता मोहिमेत सुमारे एक ट्रॉली कचरा गोळा करण्यात आला. या वेळी श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज संस्थेचे सचिव तुषार पाटील, मुख्याध्यापिका सुनंदा शिवदास, सुशांत साळुंखे, रवींद्र निकम, अंजली साळुंखे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, वितरण व्यवस्थापक तानाजी गायकवाड, जाहिरात व्यवस्थापक संजय कदम उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. 

स्वच्छतेच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात समाजासमोर मोठी समस्या निर्माण होऊ शकते; पण या शाळेच्या विद्यार्थ्यांकडून नियमितपणे राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता होईल, असे श्री. कात्रे यांनी सांगितले. अशा उपक्रमाला कृतिशील सहभाग देऊन ‘सकाळ माध्यम समूह’ नेहमीच प्रोत्साहन देते, असेही त्यांनी सांगितले.    

विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. त्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. या उपक्रमात शाळेतील ‘सकाळ एनआयई’चे सदस्यही मोठ्या संख्येने सहभागी झाले. इयत्ता पाचवीने शाळेचे पटांगण, इयत्ता सहावीने शाळेचे मैदान व नजीकचे रस्ते, सातवीने करंजे नाका ते महालक्ष्मी मंदिर, आठवीने झेंडा चौक ते करंजे कमान, नववीने भैरवनाथ पटांगण ते ननावरे आळी, कमान, दहावीने मुख्य बाजारपेठ ते भैरवनाथ मंदिर आदी ठिकाणी स्वच्छता केली. प्लॅस्टिक कागद, टाकलेल्या बाटल्या, पालापोचाळा आदी सुमारे एक ट्रॉली कचरा गोळा केला. नंतर त्याची विल्हेवाट लावण्यात आली. 

या वेळी विद्यार्थ्यांसमवेत महेश वसावे, वृषाली कुंभार, गौरी पवार, वैशाली कुंभार, अलकनंदा कोळी, रोहिणी यादव, ज्योती सातपुते, यशवंतराव गायकवाड, शलाका भोसले, लतिका ननावरे, अमरसिंग वसावे, सुनंदा जाधव, कविता हेंद्रे, उषा नांगरे, रवींद्र फडतरे, सुनीता देशमुख, प्रियांका इंदलकर, काशिनाथ वाईकर, वसंत पोतेकर, आशा फडतरे, आशालता निकम, रोहिणी चौगुले या शिक्षकांनी व ‘सकाळ’च्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. 

दर महिन्यातून मोहीम...
श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज दर महिन्यातून एकदा मोहीम राबवून स्वच्छतेविषयी प्रबोधनाचे काम करीत आहे. आज दोन ऑक्‍टोबर गांधी जयंतीची सुटी असतानाही सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले व त्यांनी करंजे गावातील प्रमुख ठिकाणे चकाचक केली.

Web Title: satara news cleaning campaign