कॉंग्रेसमधील "तो' फ्रेश चेहरा कोण? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

सातारा - जिल्हाध्यक्षपदावरून वाद करणाऱ्या कॉंग्रेसच्या दोन्ही आमदारांना बाजूला ठेवत फ्रेश चेहऱ्याला संधी देण्याची भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल "सकाळ'शी बोलताना घेतली; पण या फ्रेश चेहऱ्यामागे नेमकं कोणाचे नाव दडलंय याचा शोध कॉंग्रेसचे कार्यकर्ते घेऊ लागले आहेत. ऐन वेळी रणजितसिंह निंबाळकर, ऍड. विजयराव कणसे, धैर्यशील कदम किंवा मदन भोसले यापैकी एकाचे नाव पुढे येण्याची शक्‍यता असली, तरी गोरे समर्थकालाच अधिक स्थान मिळण्याची चिन्हे आहेत. 

कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून सुरू असलेल्या वादात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणताही हस्तक्षेप न करता थेट फ्रेश चेहऱ्यालाच संधी देणार असल्याचे सांगून कॉंग्रेसमधील सर्वांच्याच चेहऱ्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. आता सर्व जण बाबांच्या नजरेत नवीन चेहरा कोण असेल, याची चाचपणी करू लागला आहे. वाई, फलटण, माण, कोरेगाव, कऱ्हाड या तालुक्‍यांतून नेमके कोणाचे नाव पुढे येऊ शकते, याचा अंदाज पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते बांधू लागले आहेत. आता वादामुळे आमदार गोरे आणि आनंदराव पाटील यांची नावे बाजूला पडली असली, तरी गोरे समर्थकांपैकी एकाचे नाव ऐन वेळी पुढे येण्याची शक्‍यता आहे. आता कॉंग्रेसमध्ये नवीन चेहऱ्यांमध्ये फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर, सध्याचे कार्याध्यक्ष ऍड. विजयराव कणसे, पुसेसावळीचे धैर्यशील कदम यांची नावे पुढे येत आहेत; पण त्यातूनही माजी जिल्हाध्यक्ष मदन भोसले यांनादेखील पुन्हा संधी देण्याबाबत विचार होऊ शकतो. मदन भोसले यांच्याकडे भाजपच्या नेत्यांचे वाढलेले लक्ष विचलित करण्यासाठी बाबांकडून त्यांनाच संधी देण्याबाबत विचार होऊ शकतो. मात्र, आमदार गोरेंच्या समर्थकांचा विचार झाल्यास रणजितसिंह नाईक-निंबाळकर किंवा धैर्यशील कदम यांचे नाव पुढे येऊ शकते. या सर्व शक्‍यतेत यापेक्षा आणखी वेगळा चेहरा पुढे आणला गेल्यास तो कॉंग्रेसजनांना सुखद धक्का असेल.

Web Title: satara news congress