माजगावात यात्रेदिवशी दोन कुटुंबांत मारामारी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

चाफळ - घरासमोर दुचाकीला गाडी आडवी लावल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत तीन महिला आणि अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना माजगाव (ता. पाटण) येथे रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. शरद बाळकृष्ण जाधव व सचिन भाऊसाहेब चव्हाण हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पोलिसांनी सांगितले, की रविवारी माजगावची यात्रा होती. दुपारी दोनच्या सुमारास येथील सुरेश उत्तम जाधव यांच्या मुलाने नाना आबा पाटील यांच्या घरासमोर पाटील यांच्या दुचाकीला आपली दुचाकी आडवी लावली होती. यावरून जाधव व पाटील यांच्यात शाब्दिक वादावादी घडली. या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. शरद जाधव, सचिन चव्हाण, सविता सुरेश जाधव, संगीता भाऊसाहेब चव्हाण, रंजना विठ्ठल सोमदे यांना सुनील जयवंत चव्हाण, अजय बाबूराव जाधव, नाना आबा पाटील, बंडा आबा पाटील व सुनील चव्हाण याचा लहान भाऊ (नाव समजू शकले नाही) या चौघांनी शिवीगाळ करत दांडक्‍याने मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद सुरेश उत्तम जाधव यांनी उंब्रज पोलिसांत दिली. शरद जाधव व सचिन चव्हाण यांच्या हात, कान व डोक्‍याला मार लागल्याने त्यांना कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या गटाने दिलेल्या फिर्यादीत म्हटल्यानुसार वैभव जयवंत चव्हाण हाही दुपारच्या भांडणात होता असे म्हणत सुरेश जाधव, शरद जाधव, सचिन चव्हाण, सोन्या जाधव यांनी काठीने मारहाण करत हात व पायाला गंभीर दुखापत केली. वैभव जयवंत चव्हाण याने ही फिर्याद दिली आहे. 

Web Title: satara news crime

टॅग्स