पतीला धमकी देऊन महिलेवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

सातारा - पुणे-बंगळूर महामार्गावर वाढेफाट्यानजीक शेतात पतीस जीवे मारण्याची धमकी देऊन रविवारी (ता.18) रात्री 21 वर्षीय युवतीवर बलात्कार केला. यावेळी झालेल्या आरडाओरड्यामुळे ग्रामस्थांनी पाठलाग करून दोन संशयितांना शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. 

विशाल मुकाप्पा कोळी व नवनाथ प्रकाश जाधव (दोघे रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार) अशी अटकेत असलेल्या संशयितांची नावे आहेत. संबंधित महिला ही मूळची नगरची असून, ती गेल्या काही महिन्यांपासून येथे पतीसह राहते. रविवारी रात्री पती-पत्नी वाढेफाटा येथून चालत कॅनॉललगत गेल्यानंतर दोन संशयितांनी त्यांचा रस्ता अडवला. त्यांना दमदाटी करण्यास सुरवात केली. दोघे घाबरून गेले. संशयितांनी पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार केला. 

पीडितेने मदतीसाठी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील काही ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. लोक येत असल्याचे पाहून संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी ग्रामस्थांनी पाठलाग करून दोघांना पकडले. शहर पोलिसांनी दोघांना अटक केली.

Web Title: satara news crime Rape case

टॅग्स