साताराः कृष्णा नदीकाठी मगरीचा वावर: नागरिकांमध्ये घबराट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

कऱ्हाड (सातारा): तालुक्यातील गोंदी येथील कृष्णा नदीकाठी मगरीचा वावर आढळून आला असून, आठवड्यात ती नदीकाठावर दिसत होती. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

मगरीच्या दर्शनामुळे नदीकाठी जाण्यास ग्रामस्थ घाबरत आहेत. लगतच्या गायरान क्षेत्रात जनावरे हिंडवणाऱया शेतकरी वर्गामध्येही मगरीची धास्ती निर्माण झाली आहे. वनविभागाने त्वरीत यावर उपाययोजना आखण्याची ग्रामस्थांमधून मागणी होत आहे. गावच्या पश्चिमेस कृष्णा नदीचा प्रवाह आहे. त्यालगत सुमारे 70 एकर जनावरांना चरण्यासाठी गायरान आहे. त्याचबरोबर गावालगत मोठा पाणवठाही आहे. त्यामुळे दिवसभर त्या भागात महिला व पुरुष वर्गाची मोठी वर्दळ राहते.

गेल्या आठवड्यामध्ये नदीचे पाणी पात्राबाहेर आले होते. दोन दिवसात पाण्याची फुगलेली पातळी ओसरल्यानंतर गायरानमध्ये जनावरे हिंडवण्यास आलेल्या शेतकऱयांना नदीमध्ये मगरीचे दर्शन झाले. ही बाब त्यावेळेस कुणी फारशी मनावर घेतले नाही. त्यानंतर अनेकांना तिचे वारंवार दर्शन होवू लागल्यानंतर सर्वत्र घबराट पसरली आहे. त्यामुळे पानवठ्यावर महिला कपडे धुण्यासाठी जाण्यास धाडस करत नाहीत. मगरीच्या वावरामुळे आठवडाभर पाणवठा ओस पडला आहे. वन विभागाने त्वरीत साफळा रचून मगरीस पकडावे, अशी लोकांची आग्रही मागणी आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: satara news crocodile found in Krishna river