सातारा जिल्ह्यातील धरणांत गतवर्षीपेक्षा जादा पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

सातारा - जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या हजेरीमुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागलेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत प्रमुख धरणांत जादा पाणीसाठा झाला आहे. तरीही पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी वर्गाला पावसाची आशा लागून आहे. राज्याच्या वीज निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कोयना धरणात २६.२० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 

जिल्ह्यात पावसाची हजेरी लागल्याने शेतकऱ्यांकडून पेरणीच्या कामांना गती आली. धरणाच्या परिसरात पावसाचा जोर वाढू लागल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोयना धरणातून वीजनिर्मिती तसेच दोन वेळा कर्नाटकला पाणी दिल्यामुळे धरणाची पातळी खूप कमी झाली होती. आज सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत धरण क्षेत्रातील कोयना १३४, नवजा १६१, महाबळेश्वर १६२ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने २४ तासांत धरणात २.६२ टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली. धरणात २६.२० टीएमसी (२१.०५ टक्के) पाणीसाठा झाला. इतर धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. त्यामध्ये धोम ०.१०, उरमोडी ०.११, कण्हेर ०.१२, तारळी ०.४२, धोम-बलकवडी ०.१० टीएमसीने वाढ झाली आहे. या प्रमुख धरणांत धोम- बलकवडीचा अपवाद वगळता गतवर्षीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा आहे. 

धरण क्षेत्रातही पावसाचा जोर असल्याने धरण्याच्या पातळीत वाढ होत आहे. सध्या धोम धरणात ११.५५, उरमोडी ४५.१०, कण्हेर १५.४९, तारळी २०.५६, धोम-बलकवडी ९.२५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जुलै व ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या महिन्यांत धरणात सर्वाधिक पाण्याची आवक होत असते. यामुळे पुढील दोन महिन्यांत किती पाऊस पडेल, यावर धरणांतील पाणीसाठ्याचे भवितव्य ठरणार आहे.

Web Title: satara news dam water