दीपक पवार यांचा तुघलकी कारभार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

सातारा - पक्षाप्रती प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोडून दीपक पवार यांच्या हट्टासाठी पालिका निवडणुकीपुरते पक्षात आलेल्यांना स्वीकृतपदी संधी दिली गेली. यात तडजोड झाली असून, एककलमी व तुघलकी कारभार सुरू असल्याचा आरोप भाजपचे शहर अध्यक्ष सुनील काळेकर व त्यांच्या कार्यकारिणीने एका पत्रकाद्वारे केला आहे.

या पत्रकावर श्री. काळेकर यांच्यासह सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी, उपाध्यक्ष अप्पा कोरे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कांबळे व ११ पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. पत्रकामध्ये भाजपचे विधानसभेचे उमेदवार आणि जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त करत तडजोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालिका निवडणूक लढविलेल्यांपेक्षा पक्षासाठी काम करणाऱ्यांना स्वीकृत सदस्यपदी संधी द्यावी, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे व कोअर कमिटीचे धोरण आहे. असे असताना पालिका निवडणुकीपुरते पक्षात आलेल्या व त्यानंतर पक्षाच्या कोणत्याही बैठकीकडे न फिरकणाऱ्या आणि पक्षाचा कोणताही कार्यक्रम न राबविणाऱ्या व्यक्तीस श्री. पवार यांच्या हट्टामुळे संधी देण्यात आली. कोणत्याही निर्णयात शहर कार्यकारिणीला विश्‍वासात घेतले जात नाही.

श्री. पवार यांच्या मनमानी कारभाराला व शहर कार्यकारिणीला विश्‍वासात न घेण्याच्या कृतीविरुद्ध शहर भाजपचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील, असा इशाराही या पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

Web Title: satara news deepak pawar BJP