राईनपाडा घटनेचे साताऱ्यात पडसाद

राईनपाडा घटनेचे साताऱ्यात पडसाद

सातारा - राईनपाडा (जि.धुळे) येथे मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीचा निषेध आज नाथपंथीय डवरी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बोंबाबोंब आंदोलन करून केला. या प्रकारामुळे समाजातील गावोगावी भिक्षा मागत फिरणाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न न केल्यास मुख्यमंत्र्यांना पश्‍चिम महाराष्ट्रातील दौऱ्यात काळे झेंडे दाखविण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आदिवासीबहुल साक्री तालुक्‍यातील राईनपाडा (जि. धुळे) येथे मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत नाथपंथीय डवरी समाजातील असून, गावोगावी भिक्षा मागत फिरणाऱ्यांतील आहेत. त्यांना झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याने समाजात असंतोष आहे. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात मारेकऱ्यांना आतंकवादी घोषित करून त्यांना जन्मठेप अथवा फाशी व्हावी, मृताच्या प्रत्येक कुटुंबास प्रत्येकी दहा लाख रुपये द्यावेत, या दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा, अन्यथा त्यांना पश्‍चिम महाराष्ट्रातील दौऱ्यात काळे झेंडे दाखवू, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी नाथपंथी डवरी गोसावी समाज संघटना भटक्‍या विमुक्त जाती आघाडीचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष नवनाथ शिंदे, महेश पवार, गणेश पवार, अविनाश पवार, भोपाल घाडगे, मोहन शिंदे, बाळू इंगवाले, फारुख पटनी, दत्ता इंगवले, शंकर बाबर, कालिदास शिंदे, सनी पवार, धोंडिराम इंगवले आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com