आला पावसाळा... साथ रोगांपासून सांभाळा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

सातारा - पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथीच्या विविध रोगांना आमंत्रण मिळते. डासांचे प्रमाण वाढते. डासांमुळे होणाऱ्या मलेरिया, डेंगी, चिकूनगुणिया या साथीच्या रोगांचा प्रसार होतो. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. 

स्वच्छ पाणी प्या 
दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरतात. रुग्णांमध्ये कावीळ, टायफॉईडचे रुग्ण जास्त आढळतात. त्यासाठी ग्रामपंचायत किंवा पालिकेच्या निर्जंतुकीकरणाच्या प्रक्रियेकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. घरामध्ये एक लिटर पिण्याच्या पाण्यात एक थेंब मेडिक्‍लोर टाकून पाणी प्यावे किंवा उकळून थंड केलेले पाणी पिणे चांगले.  

डासांची उत्पत्ती रोखा
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात चिकूनगुणियाची साथ दिसत आहे. ही साथ डासांमुळे येते. चिकूनगुणियाच्या ‘व्हायरस’चा वाहक हा डास आहे. त्यामुळे चिकूनगुणियाची लागण एकाच वेळी ४० टक्के लोकांना होते. त्यामध्ये सांधेदुखीचा त्रास फार जाणवतो. पावसाळ्यात फ्ल्यू, मलेरिया, सर्दीतून होणारा ताप या प्रकारचे साथीचे रोग येतात. त्यामुळे डासांचे उत्पत्ती रोखणे आवश्‍यक आहे. त्यासाठी डबक्‍यांमध्ये जळके ऑईल किंवा गप्पी मासे सोडले पाहिजेत. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळला पाहिजे.

हे आवर्जून करा...
 पाणी गाळून, उकळून थंड करून प्या. 
 हात सतत स्वच्छ धुवावेत. 
 उलट्या व जुलाब असल्यास आले घालून लिंबू-पाणी प्या. 
 जेवणात प्रामुख्याने मुगाचे पदार्थ, फळभाज्यांचा समावेश करा. 
 पावसात भिजल्यावर अंग लवकर कोरडे करा. 
 थंड हवेपासून बचाव करण्यासाठी बाहेर जाताना कानात कापूस ठेवा. 
 तेलकट व तिखट खाणे टाळा. 
 उघड्यावरील अन्नपदार्थ, शिळे अन्न खाणे टाळा. 
 वैयक्तिक, घर आणि परिसर स्वच्छतेची काळजी घ्या. 
 बेकरीचे व आंबवलेले पदार्थ खाणे टाळा.
 डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी डबक्‍यात गप्पी मासे सोडावेत.
 डबक्‍यांवर रॉकेलची फवारणी करावी.

Web Title: satara news diseases care in rainy season