दिवाळीने बाजारपेठेला कोटींची झळाळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

सातारा - दिवाळी हा जसा प्रकाशाचा सण, तसाच तो खरेदीचे शिखर गाठणाराही उत्सव. दिवाळी पाडव्याचा मुहूर्तावर साताकरांनी ‘खरेदी डे’च साजरा केला. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, स्मार्टफोन, वाहनांची सर्वांधिक खरेदी झाली. शिवाय मुदतबंद ठेवी, इन्शुरन्सचा मुहूर्तही अनेकांनी साधला. सराफ कट्ट्यांसह रिअल इस्टेट, विविध इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंपासून ते शिलाई मशिन आणि पाण्याच्या शेगडीपर्यंत सर्वच क्षेत्रांत तेजीचे वातावरण पसरले. 

दिवाळीनिमित्त, पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी बाजारात ग्राहकांसाठी विविध सवलतींच्या, बक्षीस योजना जाहीर लागू केल्या होत्या. आपल्या आवडीनिवडी, बजेटचा विचार करून खरेदी करण्याकडेच सर्वांनी भर दिला. बहुतांश जणांनी मुहूर्तावर सोने खरेदीतही मोठी गुंतवणूक केली. त्यामुळे काही दिवसांपासून खरेदीसाठी शहरातील प्रमुख बाजारपेठा हाउसफुल्ल झाल्या. यंदा बहुतांश ठिकाणी शंभर टक्के फायनान्सची सोय उपलब्ध होती. 

फायदेशीर व सुरक्षित गुंतवणूक म्हणून आजही सोन्याला पसंती दिली जाते. ट्रॅडिशनल, अँटिक अशा सोन्याच्या दागिन्यांबरोबर चांदीची नाणी, भांडी यांचीही खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. त्याशिवाय गुंजभर का असेना मुहूर्तावर सोने खरेदीची परंपरा अनेकांनी जपली. दिवाळीपासून पाडव्यापर्यंत बाजारात उपलब्ध विविध कंपन्यांच्या हजारो दुचाकींची, तर शेकडो चारचाकींची विक्री झाली. 

एलईडी टीव्हीवर डीटीएच, डीव्हीडी मोफत यांसारख्या योजनांमुळे टीव्ही खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. शिवाय फ्रीज, वॉशिंग मशिन, पंखे यांची खरेदीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मोबाईलवर सिमकार्ड, टॉकटाइम अशा अनेक ऑफर्स असल्याने मोबाईल खरेदीनेही यंदा उलाढालीचा उच्चांक गाठला. 

शिवाय, मोबाईल खरेदीसाठी कर्ज मिळत असल्याने ग्राहक त्याचा लाभ घेत होते. स्मार्टफोनच्या खरेदीत तब्बल ७० टक्‍क्‍यांहून अधिक ग्राहक वाढला असल्याचे दिसून आले. रिअल इस्टेट क्षेत्रात कमी प्रमाणात का होईना पण उलाढाली झाल्या. गारमेंट, फर्निचर क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. एकंदरीत दिवाळीतील खरेदी-विक्रीमुळे बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होऊन बाजारपेठेला झळाळी मिळाली.

Web Title: satara news diwali market transaction