कऱ्हाड: पालिकेने हटविली अतिक्रमणे

सचिन शिंदे
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

न्यायालय परिसर, बस स्थानक, मुख्य पोस्ट आॅफीस, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा परिसर व बस स्थानकावरील अतिक्रमण हटवण्यात आली. अनेक विक्रेत्यांनी स्वतः काही अतिक्रमणे काढली.

कऱ्हाड : शहरातील विविध ठिकाणचे अतिक्रमण हटवण्याची मोहिम पालिकेने हाती घेतली. पालिकेचे चार अधिकारी व पन्नास कर्मचारी त्यात सहभागी झाले.

न्यायालय परिसर, बस स्थानक, मुख्य पोस्ट आॅफीस, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा परिसर व बस स्थानकावरील अतिक्रमण हटवण्यात आली. अनेक विक्रेत्यांनी स्वतः काही अतिक्रमणे काढली.

काही पालिकेने हटवली. त्यात हातगाडा, खोक्यांचा समावेश होता. सकाळी अचानक मोहिम सुरू झाल्याने विक्रेत्यांमध्ये धावपळ उडाली.

Web Title: Satara news encroachment in karhad