शोषखड्डे मोहिमेस ‘सीईओं’च्या भेटीने गती शक्‍य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

वाई तालुक्‍यातील कृष्णाकाठच्या गावांना भेट; २० जूनपर्यंत कामे पूर्ण करण्याची सूचना
सातारा - कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेंतर्गत वाई तालुक्‍यातील कृष्णाकाठच्या गावांना मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शोषखड्ड्यांच्या कामांची पाहणी केली. सर्व गावांनी २० जूनपर्यंत शोषखड्ड्यांचे उद्दिष्ट पूर्ण करावे, कृष्णेच्या पात्रात जाणारे सांडपाणी रोखण्यास हातभार लावावा, असे आवाहन करत ही कामे तातडीने पूर्ण करून घेण्याच्या सूचना त्यांनी गटविकास अधिकारी व सरपंचांना केल्या.

‘सकाळ’ने कृष्णा नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्याला वाई तालुक्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता या मोहिमेचा दुसरा टप्पा म्हणजे कृष्णाकाठच्या गावातील सांडपाणी नदीपात्रात जाण्यापासून रोखणे होय. वाई तालुक्‍यातील नदीकाठच्या गावांतील सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्याने पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. गावातील सांडपाणी गावातच मुरवले, तर नदीपात्रात सांडपाणी जाणार नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांत शोषखड्डे घेण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महात्मा गांधी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून हे शोषखड्डे घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने पुढाकार घेतला आहे. यात वाई तालुक्‍यातील नदीकाठच्या गावांत प्रत्यक्ष जाऊन डॉ. राजेश देशमुख यांनी पाहणी केली, तसेच उर्वरित कामांना गती देण्याची सूचना त्यांनी केली. या वेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, वाईचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, खंडाळ्याच्या गटविकास अधिकारी गीता बापट यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी डॉ. देशमुख यांनी असले, शेंदूरजणे, कडेगाव या गावांतील शोषखड्डे व घरकुलांच्या कामांची पाहणी केली. खंडाळा तालुक्‍यातील लिंबाचीवाडी, कर्नवडी आदी गावांचा पाहणी दौरा केला. प्रत्यक्ष लाभार्थ्यांना भेटून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी विहीर पुनर्भरण, रमाई घरकुल, कृष्णाकाठच्या गावांतील शोषखड्ड्यांच्या कामांची पाहणी केली. यात वाई तालुक्‍यातील कृष्णाकाठच्या 

Web Title: satara news Exploitation campaign