‘मागेल त्याला शेततळे’ उद्दिष्टपूर्तीकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

जिल्ह्यात ८१० शेततळी पूर्ण; ८५६ कामे सुरू, ३.५ कोटी अनुदान वितरित
सातारा - राज्य सरकारने शाश्‍वत पाणी उपलब्धतेसाठी सुरू केलेल्या ‘मागेल त्याला शेततळे योजने’स जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असून, ही योजना उद्दिष्टपूर्तीकडे निघाली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून तीन हजार २११ अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, आतापर्यंत ८१० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून, ८५६ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानापोटी तीन कोटी ५६ लाख रुपयांचा निधी 
दिला गेला आहे. 

‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेत जिल्ह्यात दोन हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट दिले आहे. ही योजना सर्वसमावेशक झाल्याने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होता येऊ लागल्याने टप्पाटप्प्याने प्रतिसाद वाढला आहे. सध्या तीन हजार २११ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये दोन हजार ६८६ अर्ज पात्र तर ४६१ अर्ज अपात्र ठरले असून, ५८ अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे. पात्र अर्जापैकी दोन हजार ३०२ अर्जांना मंजुरी दिली आहे. एक हजार ६७३ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे. सध्या ८५६ शेततळ्यांचे काम सुरू असून, ८१० शेततळ्याची कामे पूर्ण झाली आहेत. यापैकी ७८९ शेततळ्यांसाठी तीन कोटी ५६ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

दुष्काळी माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव या दुष्काळी तालुक्‍यांत प्रतिसाद चांगला असून, पश्‍चिमेकडील कऱ्हाड, वाई, सातारा तालुक्‍यांतून प्रतिसाद वाढला आहे. मात्र, महाबळेश्वर, जावळी, पाटण या तालुक्‍यांत कमी प्रतिसाद मिळत आहे. 

योजना सुरू होताच दोन हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. मात्र, आता मागेल त्याला शेततळे देण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा शाश्‍वत स्त्रोत निर्माण करण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे. कृषी विभागाने याकडे अधिक लक्ष देत ही योजना गतीने, प्रभावीपणे राबविली पाहिजे. त्यातून सुमारे चार हजारांपेक्षा जास्त शेततळी पूर्ण होण्यास मदत होईल.

Web Title: satara news farm lake