पावसाने अडचणीत आलेला शेतकरी अडकला अटींच्या जोखडात

हेमंत पवार
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

अगोदरच पावसाने सोयाबीनची वाट लागली. त्यातुन जे राहिले आहे ते काढुन विक्रीस नेल्यावर तेथे आर्दतेचे आणि एकरी आठ क्विंटलचे आडवे लावले जात आहे. हे पुर्णता चुकीचे आहे. आर्दता आणि उत्पादन शेतकऱ्यांचा हातात आहे का? अटी घालताना जरा तरी विचार करायला पाहिजे होता.
- पोपटराव पाटील, शेतकरी, तांबवे 

कऱ्हाड : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मात्र त्या खरेदी केंद्रामध्ये सोयाबीन खरेदीसाठी आणताना त्याची आर्द्रता माॅश्चर 12 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असावी, प्रती एकरी 8 क्विंटल सोयाबीन खरेदी केले जाईल यासह अन्य जाचक अटी घातल्या आहेत. त्यामुळे अगोदरच पावसाने अडचणीत आलेला शेतकरी कसातरी सावरत असताना त्याला या जाचक अटीच्या जोखडात आडकवण्यात आल्याने एेन दिवाळीत त्याला सोयाबीन घालता न आल्याने मोठी पंचायत झाली आहे.

सरकारच्या धोरणाने एेन सणामध्ये शेतकऱ्यांवर उसनवारी करुन सण साजरा करण्याची वेळ आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सोयाबीनला केंद्र सरकारने ३ हजार ५० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र शेतकऱ्यांनी पिकवलेले सोयाबीन काही व्यापाऱ्यांनी त्यापेक्षा कमी दराने खरेदी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याविरोधात शेतकरी संघटनांनी आवाज उठवुन उपनिबंधक कार्यालयात आंदोलन केले. त्याचबरोबर राज्यभरही त्यासंदर्भात आंदोलने झाली. त्यामुळे सरकारने तातडीने हालचाली करुन पणन आणि नाफेडच्या माध्यमातुन बाजार समित्यांमध्ये खरेदी केंद्र सुरु करण्यासाठीची कार्यवाही केली.

त्यानुसार दोन दिवसापुर्वी खरेदी केंद्र सुरु करण्यात आली. मात्र त्या केंद्रावर सोयाबीनची विक्री करताना शेतकऱ्यांसाठी काही अटी पणन विभागाने घातल्या आहेत. त्यामध्ये सोयाबीन खरेदीची ऑनलाईन नोंदणी करणेसाठी सात बारा उताऱ्याची मुळप्रत, आधारकार्ड मुळ व झेरॉक्स प्रत, बँक पासबुक झेरॉक्स, सातबारा उताऱ्यामध्ये एकापेक्षा जास्त खातेदार असल्यास शेतकरी निहाय पिक पाण्याची नोंद किती आहे याची स्पष्ट नोंद गाव कामगार तलाठी यांचेकडून करून घ्यावी. सोयाबीन शेतमाल स्वच्छ चाळणी केलेला असावा. सोयाबीन शेतमाल खराब झालेला नसावा. सोयाबीनची आर्द्रता माॅश्चर 12 टक्केपेक्षा किंवा त्यापेक्षा कमी असावी, त्याचे प्रमाण जास्त असल्यास सोयाबीन खरेदी केंद्रावर स्विकारला जाणार नाही. प्रती एकरी 8 क्विंटल सोयाबीन खरेदी करता येईल या अटींचा समावेश आहे. अटीमुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. यापुर्वी सुरु कऱण्यात आलेल्या केंद्रावर कधीही अशा अटी घालण्यात आल्या नव्हत्या. सध्यामात्र त्या घालण्यात आल्या आहेत. सोयाबीनची आर्दता ही हवानामानावरच आवलंबुन असते. त्यामध्ये शेतकरी बदल करत नाही. त्यामुळे ती १२ टक्केच असेल असे नाही. त्यामुळे असेल त्या आर्दतेचे सोयाबीन खरेदी करणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

जाचक अटीच रद्द कराव्या एेन दिवाळीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणण्याचे काम सरकाराने केले आहे. एकरी ८ क्विंटल सोयाबीन खरेदी केले जाईल ही अट्टही जाचक आहे. एखाद्या शेतकऱ्यांला जादा उत्पादन झाले तर त्याने उर्वरीत सोयाबीन कोठे घालायचे. शेतकऱ्यांना १५ दिवसात खात्यावर पैस् जमा केले जातील असेही सांगण्यात आले आहे. त्यांना पैशांची गरज आहे म्हणुन शेतकरी सोयाबीन घालतात. त्यांना १५ दिवसांनी पैसे न देता तातडीने रोख देण्याची व्यवस्था करावी. सर्व अटी रद्द करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी करुन त्याविरोधात लवकरच आंदोलन करणार असल्याचे सांगितले. 

अगोदरच पावसाने सोयाबीनची वाट लागली. त्यातुन जे राहिले आहे ते काढुन विक्रीस नेल्यावर तेथे आर्दतेचे आणि एकरी आठ क्विंटलचे आडवे लावले जात आहे. हे पुर्णता चुकीचे आहे. आर्दता आणि उत्पादन शेतकऱ्यांचा हातात आहे का? अटी घालताना जरा तरी विचार करायला पाहिजे होता.
- पोपटराव पाटील, शेतकरी, तांबवे 

Web Title: Satara news farmer soyabean in Karhad