विश्‍वकरंडक स्पर्धेनिमित्त ६०० शाळांना फुटबॉल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

सातारा - सतरा वर्षांखालील ‘फिफा’ विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या प्रसारासाठी महाराष्ट्रातील २० हजार शाळांना फुटबॉल दिले जाणार आहेत. त्यापैकी सातारा जिल्ह्यातील ६०० शाळांना साडेतीन हजार फुटबॉल मिळतील. सुमारे दहा लाख विद्यार्थी एकाच दिवशी मैदानावर फुटबॉलच्या प्रचारासाठी आणले जाणार आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून कार्यक्रमांचे नियोजन सुरू असल्याचे क्रीडा कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले. 

दिल्ली, कोलकाता, गोवा, मुंबई व गुवाहाटी या मैदानांवर दहा ते १४ ऑक्‍टोबरदरम्यान १७ वर्षांखालील फिफा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसह फुटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तयारी सुरू केली आहे. राज्यातील ज्या शहरांत फुटबॉल खेळला जातो, तेथील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रमुख उद्देश आहे. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी फुटबॉल देणे, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा घेणे, युवा खेळाडूंचे अनुभवांचे कथन अशा स्वरूपाचा कार्यक्रम करण्याचे नियोजन आहे. फुटबॉलचे वाटप झाल्यानंतर  एकाच दिवशी सुमारे दहा लाख विद्यार्थी मैदानावर उतरण्याचा उपक्रमही क्रीडा विभाग हाती घेणार आहे. ‘फिफा’च्या निमित्ताने जिल्ह्यातील ६०० शाळांना फुटबॉल मिळेल. संबंधित शाळांची यादी तयार करण्याचे काम लवकरच सुरू होईल. दरम्यान, विश्‍वकरंडक स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील अनिकेत जाधव हा भारतीय संघातून खेळणार आहे.

सेल्फी पॉइंट निर्मितीचा विचार 
सोशल मीडियाचा प्रभावामुळे सर्व क्षेत्रात सेल्फी काढण्याचे प्रमाण वाढले. खेळाडूदेखील त्यामध्ये मागे नाहीत. ‘फिफा’च्या स्पर्धेनिमित्त राज्यातील क्रीडा संकुलांमध्येही वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या जाणार आहेत. येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात सेल्फी पॉइंटची निर्मिती करण्याचा विचार सुरू असल्याचे क्रीडा कार्यालयातून सांगण्यात आले.

Web Title: satara news football school