हुतात्मा महाडिक, बाहुबली, सर्जिकल स्ट्राइक...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

साताऱ्यात देखावे खुले; उत्सवाचे बदलते स्वरूप; स्वच्छता अभियानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश 
सातारा - भाविकांना उत्सवातील देखाव्यांचा आनंद लुटता यावा, यासाठी सततच्या रिमझिम पावसाला न जुमानता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून देखावे उभारले आहेत. यंदा हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांचे कर्तृत्व, बाहुबली, सर्जिकल स्ट्राइक, गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप, स्वच्छता अभियान असे विषय मांडून नागरिकांत राष्ट्रप्रेमासह सामाजिक बांधिलकीचे संदेश देखाव्यातून दिले जाणार आहेत. बहुतांश मंडळांनी आजपासून (बुधवार) देखावे खुले केले.

साताऱ्यातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी जिवंत देखाव्यांबरोबरच काही मंडळांनी हालते देखावे सादर करण्याची परंपरा जोपासली आहे. यंदा शहरात सुमारे १४ मंडळांचे मिळून तब्बल दीड तासाचे देखावे झाले आहेत. त्यामध्ये सोमवार पेठेतील अजिंक्‍य गणेशोत्सव मंडळाने इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोठ्या रकमेच्या देणगी व शुल्क आकारत आहेत. त्यामुळे सामान्यांची मुले इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्‍यता ‘शिक्षणाचे बाजारीकरण’ (बाहुबली) ही स्थिती जिवंत देखाव्यातून भाविकांसमोर मांडली आहे. फुटका तलाव गणेशोत्सव मंडळाने ‘गड आला पण सिंह गेला’ हा जिवंत देखावा केला आहे. ३२ फुटी कोंढाणा किल्ल्याची प्रतिकृतीसह तानाजींचे घर, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाल, दरबार हॉल उभारला आहे. पान ४ वर 

पोवई नाका
श्री शिवाजी सर्कल गणेशोत्सव मंडळ - देवेंद्राचे गर्वहरण. सार्वजनिक बांधकाम कर्मचारी गणेशोत्सव मंडळ - स्वामी विवेकानंद स्मारक व धबधबा.

केसरकर पेठ
बालस्फूर्ती गणेशोत्सव मंडळ - पाणीबचतीचा संदेश देणारी गणेशमूर्ती.

समर्थ मंदिर 
समर्थ गणेशोत्सव मंडळ - ‘एक था टायगर-शहीद कर्नल संतोष महाडिक’.

सोमवार पेठ
अजिंक्‍य गणेशोत्सव मंडळ - शिक्षणाचे बाजारीकरण (बाहुबली).
फुटका तलाव गणेशोत्सव मंडळ - गड आला पण सिंह गेला.
गजराज गणेशोत्सव मंडळ - संभाजी महाराजांचा जीवनपट.

शनिवार पेठ
बालविकास गणेशोत्सव मंडळ - वृद्धाश्रम.
राजकमल गजाननोत्सव मंडळ - सर्जिकल स्ट्राइक.
शनिवार पेठ गणेशोत्सव मंडळ, वाघाची नळी - गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप.

राजपथ
मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळ - छत्रपतींचा गनिमी कावा.
खण आळी गणेशोत्सव मंडळ - पर्यावरण व स्वच्छतेचा संदेश.
शिवभारत गणेशोत्सव मंडळ - श्री महादेव दर्शन.

Web Title: satara news ganesh festival 2017 satara ganesh utsav decoration