मूर्ती विसर्जन पर्यायी व्यवस्थेसाठी चाचपणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

सातारा - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आज पालिका पदाधिकाऱ्यांनी मूर्ती विसर्जनाच्या पर्यायी व्यवस्थेसाठी मोती तळे व शाहू कलामंदिरसमोरील हत्ती तळ्याची पाहणी केली. गाळाने भरलेले हत्ती तळे स्वच्छ करून त्यात प्लॅस्टिक कागद टाकल्यानंतर मूर्ती विसर्जनासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. पालिकेने त्यादृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. 

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पालिकेतर्फे प्रतापसिंह शेतीफार्मजवळ दर वर्षी कृत्रिम तळे खोदले जाते, नंतर ते मुजवले जाते. या तळ्यासाठी पालिकेच्या तिजोरीवर सुमारे ४० लाख रुपयांचा बोजा पडतो. एवढा अवाढव्य खर्च पालिकेला दर वर्षी करणे  आर्थिकदृष्ट्या झेपणारे नाही. त्यामुळे मूर्ती विसर्जनासाठी कायमस्वरूपी पर्याय निघावा, अशी पालिका पदाधिकाऱ्यांची अपेक्षा होती. त्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांत झालेल्या चर्चेअंती मोती तळे अथवा शाहू कलामंदिरासमोरील हत्ती तळ्याचा (फरासखाना) पर्याय पुढे आला. 

आज पालिकेचे उपाध्यक्ष राजू भोसले, बांधकाम समितीचे सभापती किशोर शिंदे, आरोग्य समिती सभापती वसंत लेवे, पाणीपुरवठा सभापती सुहास राजेशिर्के, आघाडीच्या प्रतोद स्मिता घोडके, पालिकेचे अधिकारी व अभियंते या वेळी उपस्थित होते. मोती तळ्याची पाहणी झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत तेथून जवळच हत्ती तळ्याची पाहणी केली. हे तळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या खासगी मालकीचे आहे. त्यांच्या पूर्वपरवानगीनंतरच मूर्ती विसर्जन कोठे करायचे याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे बांधकाम सभापती किशोर शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Web Title: satara news ganeshotsav