मंडळांना ‘गणराया ॲवॉर्ड’ची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

सातारा शहर पोलिसांनी गणेशोत्सवापूर्वी निकाल जाहीर करण्याची मागणी

सातारा - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ही उत्तम कार्य करत आहेत, याचे कौतुक नुकतेच पोलिस उपअधीक्षक खंडेराव धरणे यांनी केले. या कौतुकाने मंडळे भारावून गेली असली तरी त्यांना प्रतीक्षा आहे, ती गतवर्षीच्या गणराया ॲवॉर्ड स्पर्धेच्या निकालाची. सातारा शहर पोलिस विभागाने गणेशोत्सवापूर्वी निकाल जाहीर करावा, अशी मागणी मंडळांमधून व्यक्त होत आहे. 

शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नुकतीच अलंकार सभागृहात बैठक झाली. या बैठकीत पोलिस उपअधीक्षक श्री. धरणे यांनी २५ ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार असून, शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवात बदल होऊ लागल्याचे नमूद केले. उत्सव काळात गणेशाचे आगमन तसेच विसर्जन मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग वाढला आहे. बहुतांश मंडळांनी डॉल्बी न लावता पारंपरिक वाद्यांना पसंती दिली. परिणामी यंदा ढोल पथकांच्या संख्येत वाढ झाली आहे. यंदाही गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाची जय्यत तयारी सुरू केली आहे.  

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात मंडळांची नोंदणी करावी, नोंदणीकृत मंडळांकडून मागणी केलेली वर्गणी खंडणी समजली जावून त्याबाबत संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येतील, वर्गणी गोळा करताना कोणावरही धाकधपटशा करू नये, श्री गणेशमूर्ती आठ फुटांपेक्षा जादा उंच नसावी, सर्व मंडळांनी मंडपात घेतलेला विद्युत पुरवठा अधिकृत असावा, गणेश दर्शन तसेच देखावे पाहण्यासाठी पुरुष व स्त्री यांच्या स्वंतत्र रांगा लावाव्यात, मंडळांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वयंसेवक नेमावेत, स्वयंसेवकांना ओळखपत्रे द्यावीत, सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, ध्वनियंत्रणा लावताना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वाची अंमलबजावणी करावी, मंडळांनी बॉक्‍स कमानी उभ्या करू नयेत तसेच पाच फुटांपेक्षा अधिक उंचीचे फलक लावू नयेत आदी सूचना देण्यात आल्या.

अहवाल बासनात...
गतवर्षी शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, विधी क्षेत्रातील व्यक्तींचा गणराया ॲवॉर्ड समितीमध्ये समावेश होता. या समितीच्या दोन पथकांनी गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या होत्या. गणेशमूर्ती, देखाव्यांचे परीक्षण करून त्याचा अहवाल तत्कालीन पोलिस अधिकारी बी. आर. पाटील यांच्याकडे सादर केला होता. त्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्याने गणराया ॲवॉर्डचा निकाल जाहीर होऊ शकला नाही. स्पर्धेतील मंडळे आज ना उद्या निकाल लागेल, अशी अपेक्षा बाळगून आहेत.

Web Title: satara news ganraya award