फलटण शहरात कचऱ्याचे साम्राज्य; नगरपालिकेवर टीका

संदिप कदम
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पावसामुळे साथीच्या आजारांना पोषक वातावरण तयार झाले असतानाच शहरात ठिकठिकाणी मध्यवर्ती भागात साठलेले दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढिगारे त्यात भर ठरत आहेत. शहरातील मोकळ्या जागांवर गवत वाढले असून त्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यातून लहान मुलांसह नागरिकांना साथीच्या आजाराने घेरल्याचे चित्र दिसत आहे.

फलटण (जि.सातारा) : शहरात जागोजागी साचेल्या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे नेहमीच चर्चेत राहत असलेल्या स्वच्छता विभागाने अचानक कोणते तातडीचे काम हाती घेतलेे की शहरातील कचराकुंड्यातील कचरा उचलण्यासही पुरेशा वेळ नाही, असा सवाल नागरिक करताना दिसत आहे. 

सलग पडणाऱ्या पावसामुळे फलटण नगरपालिकेच्या स्वच्छता विभागावर नियोजना अभावी अतिरिक्त ताण पडला असून पाऊसाचे पाणी साचल्यानंतरच त्यावर उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात असते. त्यासाठी पावसाळ्यापुर्वी कोणतेही उपाययोजना करुन जनतेचा कर वाया घालवण्याची गरज नसल्याचे दाखवुन दिले आहे. तर साठलेला कचऱ्याचे जागेवरच कंपोस्ट तयार झाल्यावर शेतकऱ्यांना विकून पालिकेचे उत्पन्न वाढविण्यास मानस दिसतो.

पावसामुळे साथीच्या आजारांना पोषक वातावरण तयार झाले असतानाच शहरात ठिकठिकाणी मध्यवर्ती भागात साठलेले दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढिगारे त्यात भर ठरत आहेत. शहरातील मोकळ्या जागांवर गवत वाढले असून त्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यातून लहान मुलांसह नागरिकांना साथीच्या आजाराने घेरल्याचे चित्र दिसत आहे.

यावर पालिका प्रशासनाने वेळीच उपाययोजना आखून शहरात साठलेल्या कचऱयाची विल्हेवाट लावुन त्याठिकाणीची दुर्गंधीकमी होण्यासाठी औषधांची फवारणी करावी. त्याचबरोबर पावसाळा सुरु असेपर्यंत नियमित स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून येत आहे.

Web Title: Satara news garbage issue in Phaltan