घंटागाडी चालकांनी दाखविला ‘घंटा’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

सातारा - शहरातील कचरा उचलण्याचे काम ई- निविदेद्वारे एका कंपनीला देण्यात येणार असल्याची माहिती मिळताच घंटागाडी-चालकांनी आज काम बंद आंदोलन पुकारले. ई-निविदा रद्द करण्याबाबत उद्या (शुक्रवारी) निर्णय देऊ, असे आश्‍वासन घंटागाड्या चालक-मालकांना देत काम सुरू करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले; परंतु स्थानिकांचा रोजगार हिरावून घेतला जाऊ नये, या भूमिकेतून घंटागाड्या बंद ठेवण्याचा निर्णय अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाने घेतला. 

सातारा पालिकेद्वारे घरोघरी निर्माण होणारा कचरा घंटागाडीच्या माध्यमातून गोळा केला जातो. त्यासाठी शहरातील विविध प्रभागांमध्ये एकूण ४० गाड्या कार्यरत आहेत.

सातारा - शहरातील कचरा उचलण्याचे काम ई- निविदेद्वारे एका कंपनीला देण्यात येणार असल्याची माहिती मिळताच घंटागाडी-चालकांनी आज काम बंद आंदोलन पुकारले. ई-निविदा रद्द करण्याबाबत उद्या (शुक्रवारी) निर्णय देऊ, असे आश्‍वासन घंटागाड्या चालक-मालकांना देत काम सुरू करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले; परंतु स्थानिकांचा रोजगार हिरावून घेतला जाऊ नये, या भूमिकेतून घंटागाड्या बंद ठेवण्याचा निर्णय अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाने घेतला. 

सातारा पालिकेद्वारे घरोघरी निर्माण होणारा कचरा घंटागाडीच्या माध्यमातून गोळा केला जातो. त्यासाठी शहरातील विविध प्रभागांमध्ये एकूण ४० गाड्या कार्यरत आहेत.

या गाड्यांतून गोळा होणारा कचरा सोनगाव कचरा डेपोत टाकला जातो. काही महिन्यांपूर्वी पालिकेने घंटागाड्यांबाबत ई-निविदा काढली. ही निविदा ठाणेस्थित कंपनीकडून भरली गेली. त्याचे दर सर्वांत कमी असल्याने त्यास मंजुरी मिळणार असल्याची कानकून घंटागाडी चालक- मालकांना लागली; परिणामी आपल्याकडील काम रद्द होणार या भीतीने आज सर्वांनी मिळून घंटागाड्या प्रभागात पाठविल्या नाहीत. सर्व गाड्या सकाळी सातपासून पालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर लावल्या. साडेअकराच्या सुमारास घंटागाडी चालक- मालकांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पालिकेत ठिय्या मांडला. दरम्यानच्या काळात घराघरांतून गोळा होणारा कचरा आज घंटागाड्यांतून उचलला न गेल्याने नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या दालनात मुख्याधिकारी शंकर गोरे, तसेच काही नगरसेवकांमध्ये या प्रश्‍नांवर तोडगा काढण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर मुख्याधिकारी गोरे यांनी घंटागाडी चालक- मालक, तसेच अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्या वेळी चंद्रकांत खंडाईत, सिद्धार्थ खरात, गणेश भिसे आदी उपस्थित होते. पालिकेने काढलेली ई-निविदा तत्काळ रद्द करावी, स्थानिकांनी कर्ज काढून गाड्या घेतल्या आहेत. यामुळे त्यांचा रोजगार बुडणार अशा स्वरूपाचे म्हणणे शिष्टमंडळाने मांडले. त्यावर गोरे यांनी अद्याप नव्या निविदेचा विषय सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आलेला नाही.

अचानकपणे काम बंद करून नागरिकांना, तसेच पालिकेला अडचणीत आणण्याचे काम होत आहे. ज्यांचे काम योग्य असेल त्यांच्या गाड्या नव्या ठेकेदारास जोडून घेण्याची हमी पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी देतो, असे स्पष्ट केले. त्यावर शिष्टमंडळाने ई-निविदा रद्द करून नव्याने निविदा काढावी, अशी मागणी केली. त्यावर पुन्हा मुख्याधिकारी गोरे यांनी नगराध्यक्ष कदम यांच्यासमवेत अन्य नगरसेवकांसोबत सुमारे दीड तास चर्चा करून ई-निविदा रद्द करण्याबाबतचा निर्णय उद्या (शुक्रवार) देऊ, असे कामगार संघास स्पष्ट केले.

शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंकडे रोख
पालिकेत ठिय्या मांडलेल्या आंदोलकांची आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट घेऊन स्थानिकांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यांनतर प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना त्यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या भूमिकेवर तोफ डागली. ते म्हणाले, ‘‘टोलमध्ये जसा झोल होऊ शकतो, तसा या स्थानिकांकडून झोल करता येणार नाही म्हणून बाहेरच्यांना ठेका दिला, तर त्यांच्याकडून मलई मिळेल, हाच यामागे उद्देश असावा. घंटागाडीवाले म्हणतात, ५० लाखांची तोड झाली आहे. मला काही माहीत नाही. आमचे १२ नगरसेवक आहेत. त्यांच्या वॉर्डात स्थानिकांशिवाय कोणाचीही गाडी चालवू देणार नाही. पालिकेत बहुमताच्या जोरावर जी मोगलाई चालली आहे, ती थांबवावी. भूमिपुत्रांना न्याय द्यावा. टोलवाल्यांचे काम काढले जाईल म्हणून तुमची तळपायातील आग मस्तकात जाते. तुमच्याच पालिकेत काय प्रकार सुरू आहे, सातारकरांना लुटायचे बंद करा.’’

कर्मचारी संघाचे बेमुदत आंदोलन सुरू राहील. आंदोलनाचा दुसरा टप्पा लवकरच जाहीर करू.
- सिद्धार्थ खरात, सरचिटणीस, कर्मचारी संघ 

Web Title: satara news ghantagadi agitation