कऱ्हाड: स्वाईन फ्लूमुळे दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू

संतोष चव्हाण
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

उंब्रज येथील दीड वर्षीय स्वरा स्वप्निल थोरात हिला रूबी रुग्णालयात स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज सकाळी तिची प्राणज्योत मालवली. काही दिवसापासून मसूर परीसरात तीन जणांचा स्वाइन फ्लू ने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.

उंब्रज (ता. कऱ्हाड) : येथील स्वाईन फ्लु झालेल्या दीड वर्षाच्या मुलीचा पुणे येथील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कऱ्हाड मसूर पाठोपाठ उंब्रजलाही स्वाइन फ्लूने रूग्ण  दगावल्याने लोकात घबराट पसरली आहे.

उंब्रज येथील दीड वर्षीय स्वरा स्वप्निल थोरात हिला रूबी रुग्णालयात स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज सकाळी  तिची प्राणज्योत मालवली. काही दिवसापासून मसूर परीसरात तीन जणांचा स्वाइन फ्लू ने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटना ताज्या असतानाच उंब्रज येथील दीड वर्षांच्या स्वराला पंधरा दिवसापासून ताप व सर्दी झाली होती. त्यानंतर तिच्यावर  मसूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

यानंतर काही दिवसापासून श्वसनाचा त्रास होवु लागल्याने कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता १७ ऑगस्टला स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी रक्ताचे नमुने मुंबई येथे पाठविण्यात आले होते. हे नमुने पॉझिटिव्ह आल्याने तिला उपचारासाठी शनिवारी (ता.19) दुपारी पुणे येथे रूबी रुग्णालय येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान आज (रविवारी) सकाळी स्वराची प्राणज्योत मावळली. या घटनेने उंब्रजसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Satara news girl died on swine flu