पेपर अवघड गेल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

सातारा - दहावीचा पेपर अवघड गेल्याने आनेवाडी (ता. जावळी) येथील एका विद्यार्थिनीने काल रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. स्नेहल अर्जुन फरांदे (वय 16) असे तिचे नाव आहे. दहावीचे अजून दोन पेपर बाकी आहेत. मात्र, दिलेल्या पेपरमधील एक अवघड गेल्यामुळे तिने गळफास लावून घेतला. ही गोष्ट निदर्शनास आल्यावर चुलते सुभाष फरांदे यांनी तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, तिचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Title: satara news girl student suicide