"जीएसटी'पूर्वी "ऑफर'चा पाऊस! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

सातारा - वस्तू व सेवाकराची (जीएसटी) एक जुलैपासून अंमलबजावणी लागू होत आहे. एक वर्षापेक्षा जास्त जुन्या मालाच्या विक्रीवर कर परतावा मिळणार नसल्याने तो "स्टॉक' काढण्याचा प्रयत्न व्यावसायिकांकडून सुरू आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी "सेल', "ऑफर' दिल्या जात आहेत. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीदारांची संख्याही वाढली आहे. 

सातारा - वस्तू व सेवाकराची (जीएसटी) एक जुलैपासून अंमलबजावणी लागू होत आहे. एक वर्षापेक्षा जास्त जुन्या मालाच्या विक्रीवर कर परतावा मिळणार नसल्याने तो "स्टॉक' काढण्याचा प्रयत्न व्यावसायिकांकडून सुरू आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी "सेल', "ऑफर' दिल्या जात आहेत. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीदारांची संख्याही वाढली आहे. 

जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जूनअखेर शिल्लक असलेला आणि एक वर्षाच्या आत खरेदी केलेला माल (स्टॉक) विकल्यानंतर त्यावर जीएसटीचा परतावा मागता येणार आहे. त्यापूर्वीच्या मालावरील कर परतावा मिळणार नाही. त्यामुळे एक वर्षाहून जुना स्टॉक बाहेर काढण्याचे प्रयत्न सातारा, कऱ्हाड, फलटणसह जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठांतील व्यासायिकांकडून सुरू आहेत. गेल्या महिनाभरापासून साखर विक्रेत्यांनी त्यांच्याकडील शिल्लक साठा विकण्यास प्राधान्य दिले आहे. या व्यापाऱ्यांकडून गरजेपुरतीच खरेदी केली जात आहे. हाच परिणाम धान्य बाजारातही दिसून येत आहे. 

इलेक्‍ट्रॉनिक्‍स, कापड, वाहन विक्रीच्या क्षेत्रात हालचाली वाढल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी "सेल' आणि "ऑफर' दिल्या जाऊ लागल्यात. एक वर्षापेक्षा जास्त काळ कपडे शिल्लक राहण्याचे प्रमाण अधिक असते, किंबहुना ग्राहकांची आवड लक्षात घेऊन व्यापारी माल घेऊन ठेवत असतात. "एमआरपी'वरील किंमत एक हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या कपड्यांचे भाव जीएसटी लागू झाल्यानंतर वाढतील. त्यामुळे एक हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचे कपडे सवलतीत विकून नुकसान टाळण्याकडे व्यापाऱ्यांचा कल आहे. 

इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंचा "स्टॉक' करू शकणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या जास्त नसते. मात्र, नुकसान टाळण्यासाठी त्यांनीही "सेल' सुरू केले आहेत. ते ग्राहकांना फायदेशीर ठरत असल्याने सध्या खरेदीदारांची संख्या वाढलेली दिसते. लॅपटॉप, एलसीडी टीव्ही खरेदीत भरघोस सूट मिळत आहेत. वाहन विक्रीच्या क्षेत्रातही विशेषतः चारचाकी वाहनांवर "ऑफर' दिल्या जात आहेत. अनेक चारचाकी, दुचाकी विक्रेत्यांना गाड्यांवर विमा, पासिंग सुविधा मोफत देण्यास सुरवात केली आहे. काही व्यावसायिकांकडून तर एक हजारांपासून ते दहा हजारापर्यंत वाहन खरेदीवर सूट दिली जात आहे. साडेतीनशे सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या दुचाकींची किंमत वाढणार असून, अधिक क्षमतेच्या दुचाकींची किंमत कमी होणार आहे. त्याचाही फायदा ग्राहकांना आतापासूनच दिला जात आहे. 

मोबाईल विक्रेत्यांना "अच्छे दिन' 
मोबाईल विक्रीत अनेक ऑनलाइन कंपन्यांकडून स्वस्तात मोबाईल दिले जात होते. इतर राज्यांत व्हॅट कमी असल्याने तेथून मोबाइलची खरेदी झाल्याने ग्राहकांना ऑनलाइन खरेदीने कमी किंमतीत मोबाईल हॅण्डसेट मिळत होते. आता मात्र देशभरात एकच टॅक्‍स लागणार असल्याने त्याचा फटका "ई- कॉमर्स'ला बसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मोबाईल विक्रेत्यांना "अच्छे दिन' येतील, अशी आशा आहे. 

Web Title: satara news GST