गुरुजींच्या बदल्यांसाठी ऑनलाइन मॅपिंग सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

सातारा - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांसाठी राबविण्यात येणारी जिल्हांतर्गत बदलीप्रक्रिया गेल्या वर्षी विविध कारणांनी रखडली. मात्र, यावर्षी ग्रामविकास विभागाने या बदली प्रक्रियेस आतापासूनच प्रारंभ केला. त्यामुळे मे महिन्यात कोणत्याही स्थितीत शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्‍यता दिसते. 

जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेला सुरवात झालेली असून, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लॉगिंनमध्ये शाळा कोणत्या क्षेत्रात (अवघड, सोपे, पेसा, आदिवासी, महिलांसाठी गैरसोयीचे) याबाबत मॅपिंग करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यानुसार मागील वर्षी सुगम भागात असणाऱ्या कोणत्याही शाळेला इतर क्षेत्रात मॅप करता येणारी नाही. या वर्षापासून ‘पेसा’अंतर्गत येणाऱ्या शाळांचेही मॅपिंग होणार आहे. महिला शिक्षक कर्मचाऱ्यांना सेवा करण्यासाठी गैरसोयीच्या 

शाळादेखील घोषित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
बदली अधिकार प्राप्त, बदली पात्र यासह महिला शिक्षकांची माहिती भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या प्रक्रियेची माहिती ग्रामविकास विभागाकडून सातत्याने घेतली जात आहे. चालू वर्षी बदल्या करण्याबाबत ग्रामविकास विभाग ठाम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात नवीन शाळांवर नवीन गुरुजी पाहण्यास मिळतील, अशी चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे. 

प्राथमिक शिक्षण विभागामार्फत ‘सुगम’, ‘दुर्गम’ शाळांचे मॅपिंग करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- पुनीता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी 

Web Title: satara news headmaster transfer online mapping