कोयना धरणात 55.08 टीएमसी पाणीसाठा

सचिन शिंदे
बुधवार, 19 जुलै 2017

मंगळवार रात्रीपासून झालेल्या पावसाने कोयना धरणाचा पाणीसाठा ५५.०८ टीएमसी झाला आहे. दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. दोन दिवसापूर्वी कोयना धरण ४७.२७ टीएमसी होते. मात्र दोन दिवसात झालेल्या दमदार पावसाने कोयना धरणात तब्बल ७.८१ इतक्या भरघोस पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

कऱ्हाड : महाराष्ट्राची वरदायीनी ठरलेले कोयना धरण निम्म्यापेक्षा जास्त भरले आहे. आॅगस्टच्या पहिल्याच आठवड्यात धरणातून पाणी सोडण्यात येण्याची शक्यता बळावली आहे.

मंगळवार रात्रीपासून झालेल्या पावसाने कोयना धरणाचा पाणीसाठा ५५.०८ टीएमसी झाला आहे. दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. दोन दिवसापूर्वी कोयना धरण ४७.२७ टीएमसी होते. मात्र दोन दिवसात झालेल्या दमदार पावसाने कोयना धरणात तब्बल ७.८१ इतक्या भरघोस पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

कालपासून नवजा येथे विक्रमी पाऊस झाला आहे. त्याची नोंद ४०० मिलीमीटरच्या पुढे गेली आहे. काल रात्रीपासून कोयनेत २०० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद धरण व्यवस्थापनाकडे आहे. १०५.२५ टिमएमसी क्षमता असलेल्या धरणात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात दमदार झालेल्या पावसाने निम्म्याहून अधिक टप्पा पार केला आहे. धरणात आजचा पाणी साठा ५५.०८ टीएमसी पाणी साठा आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास आॅगस्टच्या पहिल्याच आठवड्यात यंदा धरणाचे वक्र दरवाजे उघडावे लागतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्या अनुशंगाने कोयना धरण व्यवस्थापणाच्या हालचाली सुरू आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Satara news heavy rainfall in Koyna Dam area