कऱ्हाड: 'एक घास बाप्पांसाठी, एक घास कुपोषितासाठी' मोहिम

हेमंत पवार
रविवार, 27 ऑगस्ट 2017

नगरसेवक सौरभ पाटील यांनी आज (रविवार) ही माहिती दिली. गणेशोत्सवाचे औचित्य साधून मंडळांच्या माध्यमातून कुपोषित बालकांसाठी धान्य गोळा करुन मेळघाटातील कुपोषितांसाठी कराडहुन पाठवण्यात येणार आहे.

कऱ्हाड : गणेशोत्सव काळात एकत्र येणारी युवकांची शक्ती विधायक कार्याकडे वळवण्यासाठी कऱ्हाडमधील यूवकांनी एकत्र येऊन मेळघाटातील कुपोषित बालकांसाठी "एक घास बाप्पांसाठी.... एक घास कुपोषितासाठी" ही मोहिम हाती घेतली आहे.

पत्रकार परिषदेत नगरसेवक सौरभ पाटील यांनी आज (रविवार) ही माहिती दिली. गणेशोत्सवाचे औचित्य साधून मंडळांच्या माध्यमातून कुपोषित बालकांसाठी धान्य गोळा करुन मेळघाटातील कुपोषितांसाठी कराडहुन पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेत या उपक्रमाची घोषणा करत असतानाच जमा झाले 1 टन धान्य जमा झाले.

Web Title: Satara news help for malnutrition children