जीवात जीव असेपर्यंत कलेची सेवा करेनः मंगला बनसोडे

हेमंत पवार
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत वयोश्रेष्ठ पुरस्काराने सन्मान

कऱ्हाड (सातारा): पणजोबा, आजोबा, आई यांच्यापासून चालत आलेली तमाशा ही कला जोपासण्याचे काम मी लहानपणापासून गेली साठ वर्षे करत आहे. माझा मुलगाही आज कलेची सेवा करत आहे. आयुष्यभर कलेची जी निस्वार्थीपणे सेवा केली त्या सेवेची पावती राष्ट्रपतींच्या हस्ते झालेल्या समान्माने मिळाली आहे. हा सन्मान माझा नसून तो माझी आई विठाबाई, सहकारी कलाकार, आणि रसिक मायबापांचा आहे. जीवात जीव असेपर्यंत मी या कलेची व रसिकांची सेवा करेन अशी ग्वाही जेष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे-करवडीकर यांनी येथे दिली.

केंद्रीय सामाजिक न्याय व हक्क मंत्रालयाच्यावतीने दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगला बनसोडे यांचा कलेतील योगदानाबद्दल वयोश्रेष्ठ सन्मान हा पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व हक्क मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री क्रिष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, सचिव जी. लता कृष्णराव उपस्थित होत्या. त्यानंतर आज त्यांनी येथे येवून पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशा कलेकडे पाहिले जाते. आमच्या पाच पिढ्या या लोककलेत काम करत आहेत. माझे पणजोबा, आजोबा, आई यांच्यापासून चालत आलेली तमाशा ही कला जोपासण्याचे काम मी लहानपणापासुन गेली साठ वर्षे करत आहे. माझा मुलगा नितीन याचा जन्म स्टेजवर कार्यक्रम सुरु असताना झाला आहे. तोही माझ्याबरोबर या कलेमध्ये काम करत आहे. तमाशा कलेतील योगदानाबद्दल माझे अजोबा भाऊ नारायणगावकर यांचा १९६१ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते तर माझी आई विठाबाई नारायणगावकर हिला १९९० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. यंदा माझा सन्नाम झाला. यापुढे राष्ट्रपतींच्या हस्ते माझा मुलगा नितीन याचाही सन्मान होईल. आमची पाच पिढ्या या कलेची सेवा करत आहोत. आयुष्यभर कलेची जी निस्वार्थीपणे सेवा केली त्या सेवेची पावती राष्ट्रपतींच्या हस्ते झालेल्या समान्माने मिळाली आहे. हा सन्मान मी आई विठाबाई, सहकारी तमाशा कलावंत आणि रसिक मायबापांचा आहे असे समजते.

अजुनही व्याजानेच पैसे काढतोय...
तमाशा फड सांभाळण्यासाठी लाखो रुपये लागतात. माझ्या फडात कलाकारांसह सर्व मिळून १५० जण काम करतात. त्यांचे संसार मी चालवते. शासन मात्र आम्हा कलाकारांना वेळच्या वेळी मानधन देत नाही. त्यामुळे हा डोलारा सांभाळण्यासाठी अजूनही व्याजाने पैसे घेण्याशिवाय पर्यायच उरत नाही ही शोकांतिकाही मंगला बनसोडे यांनी बोलून दाखवली.

Web Title: satara news I will serve the art till my life is alive: Mangla Bansode