तारळे ते मुरूड रस्त्यावर अवैध दारु साठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

उंब्रज (ता. कऱ्हाड, जि. सातारा) - तारळे ते मुरूड रस्त्याकडेला बिगरपरवाना देशी दारूची वाहतूक पोलिसांनी रोखली. पोलिसांनी  केलेल्या कारवाईत चार लाखाचा मुद्देमाल जप्त झाला. त्यात एक लाख रूपयांची अवैध दारू साठा जप्त झाला आहे. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नंदा पाराजे यांच्या पथकाने कारवाई केली.

रोहित राजेश नवले (वय. २१ रा. आंबळे ता. पाटण) असे कारवाई ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नांव आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयात परीविक्षाधीन नंदा पाराजे यांना तारळे (ता. पाटण) येथून मुरूडकडे मोटारीमधून (एम. एच. ११ ऐ. के. ६०३३)  विना परवाना देशी दारूची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने तारळे ते मुरूड रस्त्यावर सापळा रचला. मोटारीमध्ये एक लाख रुपये किंमतीचे देशी दारूचे ४० बॉक्स सापडले. विनापरवाना दारू वाहतूक करणारी मोटारही पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.

Web Title: satara news Illegal liquor seized

टॅग्स