साताऱ्यात ‘आयटक’चा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

सातारा - अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ करावी, आरोग्य उपकेंद्रांतील अंशकालीन स्त्री परिचरांना मानधन वाढवून द्यावे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, पथविक्रेत्यांसाठी पालिकांनी शहर फेरीवाला समिती स्थापन करावी आदी मागण्यांसाठी आयटक संघटनेअंतर्गत कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला. 

येथील हुतात्मा स्मारक येथून मोर्चास प्रारंभ होऊन पोवई नाकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. आयटक संघटनेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष शौकत पठाण, संघटक कॉ. सयाजीराव पाटील, कॉ. श्‍याम चिंचणे, पूर्व प्राथमिक शिक्षक सेवा संघाच्या अध्यक्षा सुजाता रणनवरे, कॉ. शिवाजी पवार, सुरेखा शिंदे, निर्मला पाटील, मालन जाधव, विमल चुनाडे, सुनीता चांगण आदींसह अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, अंशकालीन स्त्री परिचर, शालेय पोषण आहार विभागातील कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पथविक्रेते मोर्चात सहभागी झाले होते.

प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे, की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ऑक्‍टोबर २०१७ पासून मानधन वाढ देतो, असे आश्‍वासन देऊनही ते पाळले गेले नाही. एक महिन्याची आहार बिले, दोन ते तीन वर्षाचा टीएडी मिळाला नाही. मिनी अंगणवाड्यांना मोठ्या अंगणवाडीचा दर्जा मिळावा. मदतनीसांना सेविकेच्या ७५ टक्‍के मानधन मिळावे. संपात केलेली कपात परत द्यावी. आशा स्वयंसेविकांना दीड हजार रुपये मासिक मानधन सुरू करावे. गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये, आरोग्य उपकेंद्रात कार्यरत अंशकालीन स्त्री परिचर यांना दरमहा सहा हजार, शालेय पोषण आहारमधील कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये मानधन द्यावे. 
 
Web Title: satara news itak rally in satara