"आयटीआय'मध्ये ऑनलाईन प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

...असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक 
ऑनलाइन अर्ज करणे - दोन जुलैपर्यंत 
प्रवेश अर्ज निश्‍चित करणे - तीन जुलैपर्यंत 
पहिल्या प्रवेश फेरीसाठी पसंतीक्रम भरणे - चार जुलैपर्यंत 
प्राथमिक गुणवत्ता यादी - सहा जुलै, सकाळी 10 वा. 
गुणवत्ता यादीबाबत आक्षेप नोंदवणे - सहा व सात जुलै 

सातारा - येथील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. यंदादेखील आयटीआयचे प्रवेश केंद्रीय आणि ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी  http://admission.dvet.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज भरणे अपेक्षित आहे. 

प्रवेशासाठी अर्जाचा भाग एक आणि दोन पूर्ण भरावा लागणार आहे. येथील आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एक जुलैपर्यंत सकाळी 10 ते 11 या वेळेत विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. आयटीआयमध्ये सर्व प्रकारचे प्रवेश अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. तेथेच अर्ज स्वीकृती केंद्र असून विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका मिळत आहेत. या केंद्रांवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरणे, पडताळणी, स्वीकृती व निश्‍चिती करणे या आवश्‍यक बाबी करता येऊ शकतील. अर्जातील सर्व माहिती भरल्यानंतर निश्‍चित केलेल्या अर्जाचा प्रवेश फेरीसाठी विचार केला जाईल, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. अर्जाचे शुल्क खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 150 रुपये; तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 100 रुपये ठेवण्यात आले आहे. 

Web Title: satara news ITI online admission