जगदाळे, मेळाटसह काळेकरला अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

सातारा - पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी शासकीय विश्रामगृहातील खोलीत कोंडून येथील मुख्याध्यापकास मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या सुनील काळेकरसह तिघांना पोलिसांनी अटक केली. 

सातारा - पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी शासकीय विश्रामगृहातील खोलीत कोंडून येथील मुख्याध्यापकास मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या सुनील काळेकरसह तिघांना पोलिसांनी अटक केली. 

शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख हरिदास जगदाळे व भाजपच्या युवा आघाडीचा संदीप मेळाट अशी अन्य संशयितांची नावे आहेत. याबाबत मुख्याध्यापक अमोल कोळेकर (रा. शाहूपुरी) यांनी फिर्याद दिली होती. या संशयितांनी 16 मे रोजी कोळेकर यांना विश्रामगृहात बोलावून घेतले. महिलेचा विनयभंग केल्याचे कबूल करण्यासाठी त्यांना मारहाण केली. मारहाणीमुळे कोळेकरांनी कबुली दिल्यानंतर प्रकरण मिटविण्यासाठी त्यांना पाच लाख रुपये मागितले. त्याला नकार देताच त्यांना पुन्हा मारहाण केली गेली. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व संशयित पसार झाले होते. अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी जिल्हा न्यायालयात केलेला अर्जही फेटाळला गेला. आज दुपारी शहर पोलिसांनी त्यांना अटक केली. 

Web Title: satara news jagdale metalt arrested