सातारा: मलवडीत गोरे बंधूंना धक्का; सरपंचपद अपक्षाकडे

Satara
Satara

सातारा : सातारा जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायतींचे निकाल हाती येऊ लागले असून, अनेक गावांत धक्कादायक निकाल लागले आहेत. अनेक गावांत परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे. माण तालुक्‍यातील मलवडीत आमदार जयकुमार गोरे आणि शेखर गोरेंना धक्का देत अपक्ष उमेदवाराने सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. शिरवळमध्येही भाजपच्या लक्ष्मी पानसरे विजयी झाल्या असून, भुईंजमध्ये कॉंग्रेसने गड राखला आहे. 

माण तालुक्‍यात महिमानगडमध्ये राष्ट्रवादीच्या संगीता मदने सरपंच म्हणून विजयी झाल्या असून राष्ट्रवादीने ही ग्रामपंचायत राखली आहे. तसेच पाचवड, मनकर्णवाडी, पांढरवाडी याठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. वावरहिरे, परकंदी, कासारवाडी, खुटबाव, महाबळेश्‍वरवाडी, नरवणे आदी गावांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. आंधळीत कॉंग्रेसच्या मिनाक्षी काळे विजयी झाल्या आहेत. पांगरीत कॉंग्रेसचे दिलीप आवळे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले आहेत. 

शिरवळमध्ये राष्ट्रवादीची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे. भाजपच्या लक्ष्मी पानसरे सरपंच म्हणून निवडल्या गेल्या आहेत. तसेच आसवलीमध्येही सत्तांतर झाले आहे. भुईंजमध्ये कॉंग्रेसला नऊ तर राष्ट्रवादीला पाच जागा सुरूवातीच्या टप्प्यात मिळाल्या आहेत. कवठेत राष्ट्रवादी सहा तर कॉंग्रेस पाच तर श्रीकांत वीर सरपंचपदी विराजमान झाले आहेत. काळंगवाडीत सरपंचपदासाठी समान मते पडली असून कॉंग्रेस व इतर पाच जागांवर असून राष्ट्रवादीला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. किकलीमध्ये भाजपसह इतर जवळपास इतर नऊ जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादीला वर्षांनंतर प्रथमच पराभव पत्करावा लागला आहे. 
खटाव तालुक्‍यात खातवळ येथे शिवसेनेच्या रेखा फडतरे सरपंच झाल्या असून राजाचे कुर्लेमध्ये समरजित राजेभोसले विजयी झाले आहेत. ललगुणमध्ये कॉंग्रेस-भाजपचे जयवंत गोसावी यांना गुलाला लागला आहे. तसेच फलटण तालुक्‍यात पिंपरद, ताथवडा अन्‌ चव्हाणवाडीत कॉंग्रेसचा झेंडा फडकला आहे. 

आदर्की खुर्दमध्ये सौरभ निंबाळकर सरपंच झाले असून संजय व दिवाकर निंबाळकर गटाला सहा तर विश्वासराव निंबाळकर गट तीन जागा मिळाल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com