कास तलावावर लगीनघाई!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

कास - कास तलावाची उंची वाढवण्याचे काम सुरू असल्याने जेसीबी, पोकलेन, डंपरच्या आवाजाने कास तलावाचा परिसर भरून गेला आहे. 

कास - कास तलावाची उंची वाढवण्याचे काम सुरू असल्याने जेसीबी, पोकलेन, डंपरच्या आवाजाने कास तलावाचा परिसर भरून गेला आहे. 

सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलावाची उंची वाढवल्यानंतर सध्यापेक्षा पाच पट पाणीसाठा वाढेल. आता जुन्या भिंतीवरून तलावाची पाणीपातळी ३० फूट आहे. हे पाणी उन्हाळ्यात कमी पडते. धरणाच्या भिंतीतून गळती होणारे पाणी मोटारीच्या साहाय्याने पाटात उचलून पाण्याची तूट भरून काढण्याचा प्रयत्न पालिकेकडून दर वर्षी उन्हाळ्यात होतात. नवीन भिंतीमुळे गळती थांबण्याबरोबरच पाणीसाठ्यात वाढ होऊन सातारा शहराला २४ तास पाणीपुरवठा होणार आहे. कास तलावाची उंची वाढविण्याचे सध्या काम युद्धपातळीवर सुरू असून, विविध यंत्रासह कामगारांच्या वावराने कास तलावाचा परिसर गजबजला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात बुडून जाणारी व भिंतीच्या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडून कास पठारावर वन विभागाचे ताब्यात देण्यात आली आहे. राजमार्ग व चेक नाक्‍यावर ही झाडे एकत्र करून सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.

Web Title: satara news kaas lake