कास तलावात महिनाभर पुरेसे पाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

सातारा - यंदा मे महिन्यातच मॉन्सूनचे वेध लागले आहेत. कास तलावातील सध्याचा वापरायोग्य पाणीसाठा आणखी महिनाभर पुरणारा आहे. त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा सातारकरांना सुसह्य ठरला आहे. पालिकेने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन केल्याने अपवाद वगळता सातारकरांना रस्त्यावर उतरावे लागले नाही. 

सातारा - यंदा मे महिन्यातच मॉन्सूनचे वेध लागले आहेत. कास तलावातील सध्याचा वापरायोग्य पाणीसाठा आणखी महिनाभर पुरणारा आहे. त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा सातारकरांना सुसह्य ठरला आहे. पालिकेने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन केल्याने अपवाद वगळता सातारकरांना रस्त्यावर उतरावे लागले नाही. 

साताऱ्याच्या पश्‍चिम भागास कास तलावातून पाणीपुरवठा केला जातो. तलावात आजअखेर आठ फूट पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील चार फूट पाणीसाठा राखीव असतो. त्याच्यावरील तीन फूट पाणी सातारकरांना महिनाभर पुरू शकते. यावर्षी महादरे तलावानेही लवकर तळ गाठला होता. परिणामी कासच्या पाण्यावर भार वाढला. त्यातच यावर्षी सातारा व परिसरातील तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. त्यामुळे पाण्याचा वापर वाढण्याबरोबरच भाष्पीभवनाच्या प्रक्रियेमुळेही पाणी खर्च वाढला. परिणामी यावर्षी तीव्र टंचाई भासेल की काय, अशी परिस्थती होती.

सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कौशल्याने परिस्थिती हाताळली. शहराच्या काही भागात जुन्या व नव्या अशा दोन्ही वितरण व्यवस्थेतून दुबार पाणी सोडले जाते. यातील जुनी व्यवस्था बंद करून संबंधित भागातील नागरिकांना एकवेळ व पुरसे पाणी मिळेल, याची काळजी घेण्यात आली. पाण्याच्या वेळेत अल्पशी कपात करून काटकसरीचे उपाय योजण्यात आले. कास तलावातून पाझरून वाया जाणारे पाणी डिसेंबरपासूनच मोटारीने उचलून साताऱ्याकडे येणाऱ्या प्रवाहात सोडण्यात आले. 

सातारा पालिकेत विरोधकांची संख्या तुल्यबळ आहे. त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा पाण्यासाठीच्या रास्ता रोकोंना तोंड देण्यात जाणार, अशी अटकळ होती. पाणीपुरवठा सभापतिपद घेण्यास फारसे कोणी इच्छुक नव्हते. अशावेळी नगरसेवक श्रीकांत आंबेकर यांनी पूर्वानुभवाच्या जोरावर ही जबाबदारी स्वीकारली. काटकसरीचे उपाय योजून त्यांनी उन्हाळ्यात कासचे पाणी कोणालाही कमी पडू न देता आपली निवड सार्थ ठरवून दाखवली. 

कास जलवाहिनीवरील गळत्या काढल्या, रोजचे १५ मिनिटे पाणी कमी करून बचत केली. कास पाझरातील पाण्याचा पुनर्वापर व दुबार पाणी बंद केल्याने पाण्याची मोठी बचत झाली. त्यामुळे सर्वांना समान पाणीवाटप शक्‍य झाले.
-श्रीकांत आंबेकर, सभापती, पाणीपुरवठा  

Web Title: satara news kaas lake water