भाजप सरकारच्या कालावधीत कर्जाचा आकडा वाढलाः पृथ्वीराज चव्हाण

सचिन शिंदे
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

कऱ्हाड (सातारा): विकासकामांसह प्रकल्पांसाठी राज्य सरकारवर साडेआठ लाख कोटीचे कर्ज आहे. आम्ही सत्ता सोडली तेव्हा 3 लाख 20 हजार कोटीचे कर्ज होते. भाजप सरकारच्या कालावधीत कर्जाचा वाढलेला आकडा, फसवी कर्जमाफी यामुळे येथून पुढे विकास निधीसाठी अपेक्षा ठेवू नये. कर्जमाफीच्या नावाखाली विकासनिधीत 30 टक्के कपात केल्यामुळे नवीन विकासकामे मंजूर होणे कठीण आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त कले.

हजारमाची (ता. कऱ्हाड) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने विविध विकासकामांची भूमिपूजने व गांडूळ खत प्रकल्पाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. वर्धन अॅग्रोचे अध्यक्ष धैर्यशील कदम, इंद्रजीत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, पंचायत समितीच्या सदस्या सौ. वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश नलवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम दीक्षित, माजी पंचायत समिती सदस्य दिपक लिमकर उपस्थित होते.

आमदार चव्हाण म्हणाले, हजारमाचीमधील गांडूळ खत प्रकल्प ग्रामीण भागासाठी पथदर्शक आहे. ग्रामपंचायतीने जैविक खत तयार करण्याचे धाडसी पाऊल उचलेले आहे. वाढत्या नागरिकरणामध्ये आपले राज्य देशात अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे कचऱयाचे प्रमाण अधिक आहे. मुंबईच्या देवनारमधील कचरा साठवणूक केंद्राबाबत उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाने मुंबईतील नवीन बांधकामांना परवानगी नाकारली. मुंबईतून एकत्रित केलेल्या कचऱयाचे विघटन करणे शक्य नाही. त्याचे विलीनीकरण गोळ्या होण्याआधी प्रत्येकाच्या घरामधून शक्य आहे. पण याबाबत सरकारची इच्छाशक्ती कमी पडत आहे. ग्रामीण पातळीवर कचऱयाचा प्रश्न सोडविण्यासाठी हजारमाची ग्रामपंचायतीने उचलेले पाऊल स्वागतार्ह आहे.

यावेळी धैर्यशील कदम, दिपक लिमकर, नंदकुमार डुबल, सतीश पवार यांची भाषणे झाली. आमदार चव्हाण यांच्या हस्ते गावातील प्रभागनिहाय विविध विकासकामांची भूमिपूजने झाली.

Web Title: satara news karad bjp government and loan prithviraj chavan