भाजप सरकार वावटळीसारखे उडून जाईल: पृथ्वीराज चव्हाण

सचिन शिंदे
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

कऱ्हाड (सातारा): सम विचारी सगळे विरोधक एकत्र आल्यास वादळी वाऱ्यात वावटळे उडतात तसे केंद्र व राज्यातील भाजप सरकार उडून जाईल. त्यासाठी सगळे एकत्रीत येण्यासाठी राज्य व देशपातळीवर व्यापक प्रयत्न करण्याचे काम सुरू आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

कऱ्हाड (सातारा): सम विचारी सगळे विरोधक एकत्र आल्यास वादळी वाऱ्यात वावटळे उडतात तसे केंद्र व राज्यातील भाजप सरकार उडून जाईल. त्यासाठी सगळे एकत्रीत येण्यासाठी राज्य व देशपातळीवर व्यापक प्रयत्न करण्याचे काम सुरू आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

आमदार चव्हाण यांनी येथे आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्य व देश पातळीवर सरकारवर सडकून टिका केली. भाजप सरकारचा त्यांच्याच मंत्र्यावर विश्वास नाही, मात्र निती आयोगावर विश्वास आहे, अशी टिका श्री. चव्हाण यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांचे कोणी ऐकत नाही, ते कोणाविरूद्ध बोलत नाहीत, अशी सरकारची अवस्था झाली आहे, असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे त्यांच्या मंत्र्याविरोधातील अनेक तक्रारी आहेत. मात्र ते कोणत्याच मंत्र्याच्या विरोधात ब्र शब्द काढत नाहीत. मुख्यमंत्र्याचेही कोणी ऐकत नाही. त्यामुळे राज्य सरकारच अस्थीर आहे. काहीही मागणी केली की, निती आयोग त्याचा निर्णय घेईल, असे उत्तर देणाऱ्या भाजप सरकारचा त्यांच्या मंत्र्यावरच विश्वास नाही, अशी टिका करून ते म्हणाले, काहीही निर्णय घ्या, असे म्हटले की, निती आयोग त्याचा अभ्यास करेल, असे सांगितले जाते. मात्र त्याचवेळी मंत्र्यावर जबाबादारी देताना ते टाळाटाळ करतात. कारण त्यांचा त्यांच्या मंत्र्यावरच विश्वास राहिलेला नाही.

श्री. चव्हाण म्हणाले, ज्यावेळी पंडीत जवाहरलाल नेहरूना पंतप्रधान करा, असे महात्मा गांधीजी सुचवले. त्यावेळी सर्वांनीच त्यास मान्यता दिली होती. त्यात सरदार पटेलही होते. सरदार पटेल यांच्याबाबत जे काही प्रेम दाखवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, सरदार पटेल काँग्रेसचे नेते होते. त्यांच्याबद्दल आदर आहे. तर त्यांनी राष्ट्रीय स्वयसंवेक संघावर देशव्यापी बंदी आणली होती. त्या निर्णयाचे स्वागत करून तुम्ही ती बंदी आणून दाखवा. ते मान्य होईल का.

अधिवेशन बोलवण्याचे आव्हान
श्री. चव्हाण म्हणाले, सातत्याने एका विशिष्ठ चौकटीत राहून कौटुंबिक पातळीवर आरोप करणाऱ्या भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमचे आव्हान आहे. काँग्रेसने 1947 पासून काय केले व तुम्ही चार वर्षात काय केले याचा लेखा जोगा काढण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवाच. त्याचवेळी खरे खोटे सगळे बाहेर येईल. त्यावेळी 1947 पासून काँग्रेसने काय केले ते आम्ही मांडू व तुमच्या चार वर्षाच्या कामाचीही चर्चा करू.

Web Title: satara news karad bjp politics congress prithviraj chavan