कऱ्हाडला बुधवार, गुरुवारी करिअरविषयक मार्गदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

सातारा - "सकाळ' व क्रिएटिव्ह ऍकॅडमीच्या वतीने गुरुवारी (ता. आठ) कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात (टाउन हॉल) "दहावीनंतरच्या करिअर संधी, बदलते शैक्षणिक धोरण व नवीन परीक्षा पद्धती' या विषयांवर क्रिएटिव्ह ऍकॅडमीचे एन. ए. शेख यांचे, तर बुधवारी (ता. सात) प्रा. महेश जोशी (कार्यकारी संचालक, नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पेठ) यांचे "तंत्रशिक्षणाच्या संधी व फायदे' या विषयावर व्याख्यान होणार आहे. दोन्ही व्याख्याने सायंकाळी पाच वाजता सर्वांसाठी खुली आणि विनामूल्य आहेत. 

कऱ्हाड येथे मंगळवारपासून (ता. सहा) क्रिएटिव्ह ऍकॅडमी प्रस्तुत सकाळ एज्यु ऍडव्हान्टेज करिअर प्रदर्शन सुरू होणार आहे. प्रायोजक नानासाहेब महाडिक टेक्‍निकल कॅम्पस हे आहेत. त्यात सायंकाळी पाच वाजता इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी प्रदर्शनस्थळी ही व्याख्याने होणार आहेत. त्यात दहावीनंतरच्या करिअर संधी, शाखांची निवड, बारावीनंतरच्या इंजिनिअरिंग, मेडिकल, अभियांत्रिकी क्षेत्रातील जेईई, सीईटी सारख्या विविध प्रवेश परीक्षा, त्यांचा अभ्यासक्रम, बदललेले स्वरूप, त्याची तयारी आठवी-नववीपासून कशी करावी, देशातील आयआयटीसारख्या संस्था व त्यांच्या प्रवेश प्रक्रिया, प्युअर सायन्स (विज्ञान) शाखेतील करिअरचे पर्याय, बदलते शैक्षणिक धोरण व नवीन परीक्षा पद्धती अशा विषयांवर श्री. शेख हे मार्गदर्शन करणार आहेत. हेच व्याख्यान रविवारी (ता. चार) साताऱ्यात झाले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांच्या मागणीनुसार हे सेमिनार कऱ्हाड येथे घेण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी राहुल पवार ः 9922913345, प्रभाकर पवार ः 8888801245 यांच्याशी संपर्क साधावा. 

Web Title: satara news karad Career Guidance