रात्री दीड वाजता कराडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एक जखमी

जगन्नाथ माळी
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

घोगाव येथील भगवान पाटील यांचे घर फोडून चोरट्यांनी त्याच्या कपाटातील तीस हजारांची रोकड व तीन तोळे दागिने लंपास केले.

कऱ्हाड : तालुक्यातील घोगाव, साळशिरंबे दोन वेगवेगळ्या गावात सात चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातला. चोरट्यांनी दांडक्याने केलेल्या मारहाणीत राजाराम मदने (रा. घोगाव) जखमी आहेत. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास प्रकार झाला.

घोगाव येथील भगवान पाटील यांचे घर फोडून चोरट्यांनी त्याच्या कपाटातील तीस हजारांची रोकड व तीन तोळे दागिने लंपास केले. तेथीलच अशोक मारूती भावके याचेही घर फोडण्यात आले. त्यानंतर मदने वस्तीलगतच्या विवेक भोसले यांच्या फार्म हाऊस चोरटे गेले. तेथे काही सापडले नाही.

त्यावेळी तेथील वाॅचमन राजाराम मदने यास बेदम मारहाण करण्यात आली. त्यांना खोऱ्याच्या दांडक्याने मारहाण झाली. त्यात ते जखमी आहेत. त्याच रात्री साळशिरंबे येथेही दुचाकी व एका बोकडाची चोरी झाली. तीही याच टोळीने केल्याचा संशय आह.  सकाळपर्यत  पोलीस घटनास्थळी नव्हते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: satara news karad crime news robbery