साताराः वर्षभर सुरू असलेल्या कन्यागत महापर्वची सांगता

सचिन देशमुख
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

कऱ्हाड (सातारा): वर्षभर सुरू असलेल्या कन्यागत महापर्वची सांगता आज (मंगळवार) कृष्णा नदीला कऱ्हाड तीरापासून सैदापूर तर व पुन्हा तेथून कऱ्हाडतीरापर्यंत सुमारे साडे सातशे मीटर अंतराची अंखडपणे 125 साड्या नेसवून करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थित महाआरतीही झाली.

कऱ्हाड (सातारा): वर्षभर सुरू असलेल्या कन्यागत महापर्वची सांगता आज (मंगळवार) कृष्णा नदीला कऱ्हाड तीरापासून सैदापूर तर व पुन्हा तेथून कऱ्हाडतीरापर्यंत सुमारे साडे सातशे मीटर अंतराची अंखडपणे 125 साड्या नेसवून करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थित महाआरतीही झाली.

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार बाळासाहेब पाटील, नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक आदीसह मान्यवरांच्या उपस्थित हे कार्यक्रम झाले. काशी, प्रयाग, गंगा यापम्राणे प्रथमच कृष्‍णानदीला साडी नेसवण्यात येणार असल्याने या अभूतपूर्व कार्यक्रमासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मोठ्या भक्तिमय वातावरणात कार्यक्रम झाला. यावेळी नगराध्यक्षा सौ. शिंदे यांच्या हस्ते 101 कन्यांचे पूजनही करण्यात आले. यानंतर वर्षानी पुन्हा कन्यागत पर्व येणार असल्याचे समितीचे डॉ. विनायकशास्त्री गरूड यांनी सांगितले. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
वैचारिक मतभेदांचे बळी
स्वातंत्र्याच्या सत्तरीतही या गावाला पक्का रस्ता नाहीच !
मदतीचा नव्हे... खरोखरचा हात
गणपती मांस खाताना दाखविल्याने भारताकडून तक्रार
कल्याण-डोंबिवली मनपाने श्वेतपत्रिका काढावी : मनसेची मागणी
पत्नी व मुलांच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
साहित्य संमेलन धार्मिक आश्रमात नकोच : रामदास फुटाणे
बिनधास्त करा पितृपक्षात खरेदी
पाच तासांनंतर कुटुंबीयांना मृत्यूची माहिती
राज्यात तात्पुरते भारनियमन; वीजग्राहकांना सहकार्याचे आवाहन
दिल्ली : अस्खलित इंग्रजीत बोलला म्हणून तरुणास मारहाण

Web Title: satara news karad end of the Kanyaagat Mahaparav