...अन्यथा कारखानदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

साखर कारखान्यांनी भाव जाहीर करुनच ऊसतोड सुरु ठेवावी. अन्यथा सरकारने कारखानदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी मंगळवारी शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

कऱ्हाड : साखर कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर करूनच ऊसतोड सुरु ठेवावी. अन्यथा सरकारने कारखानदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता. ७) शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील व जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी ही माहिती दिली. 

सध्या साखर कारखाने सुरु झाले आहेत. मात्र साखर कारखान्यांनी ऊसाचा पहिला हप्ता जाहीर केलेला नाही. भाव न ठरवता शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जाण्याची जगाच्या पाठीवरील ही एकमेव घटना राज्यात पहायला मिळत आहे. साखर कारखान्यांनी भाव जाहीर करुनच ऊसतोड सुरु ठेवावी. अन्यथा सरकारने कारखानदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी मंगळवारी शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी दुपारी १२ वाजता कोल्हापुर नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासुन मोर्चास प्रारंभ होईल. तेथुन मुख्य रस्त्याने दत्त चौक, कचेरीसमोरुन भेदा चौकातुन तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल. तेथे निवेदन देण्यात येईल.सभा होईल. शेतकऱ्यांनी ऊसाचा दर न ठरवता ऊसतोड घेवु नये. तरच ऊसाला चांगला दर मिळेल अन्यथा ऊसाला दर मिळणार नाही. त्यासाठी मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पाटील व मुल्ला यांनी केले आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: satara news karad farmer sugarcane msp crushing

टॅग्स