कोयना नदीवरील जुना पूल 30 जुनपर्यंत वाहतूकीसाठी बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

कऱ्हाड (सातारा): येथील कोयना नदीवरील जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरु आहे. त्यासाठी जु्न्या कोयना पुलावरील दुचाकी व अन्य वाहतुक 25 मार्चपासुन 30 जुनपर्यंत बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पुणे-बेंगळुरु महामार्गावरील नवीन कोयना पुलाचा कऱ्हाड शहरात येण्यासाठी वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प उपविभागामार्फत करण्यात आले आहे.

ब्रिटीशांनी सव्वाशेवर्षापुर्वी बांधलेला जुना कोयना पुल अजुनही दुचाकीसाठी सुरु आहे. त्यावरुन पुर्वी सर्व वाहतुक सुरु होती. मात्र, ब्रिटीशांनीच पुलाला १०० वर्षाहुन अधिक काळ झाल्याने तो वाहतुकीस बंद करावा असे पत्र पाठवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संबंधित पुलावरुन चारचाकीसह अवजड वाहतुक १९७६ साली बंद करण्यात आली. सध्या फक्त दुचाकीची वाहतुक त्या पुलावरुन सुरु आहे.

Web Title: satara news karad koyna river old bridge clossed to traffic