दुधाच्या मापातील पाप थांबवण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात येणार

हेमंत पवार
गुरुवार, 11 जानेवारी 2018

कऱ्हाडला दुध दरासंदर्भातील बैठकीत दरावरुन शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आक्रमक

कराड (सातारा): दुध घेताना मापात केले जाणारे पाप थांबवण्यासाठी दुध संस्थांची अचानक तपासणी करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांचा आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे एक पथक स्थापन करण्याचा आणि वाळवा तालुक्यातील दुध संघाप्रमाणे सातारा जिल्ह्यातील दुध संघांनीही दर दिला नाही तर आंदोलन करण्याचा निर्धार आज (गुरुवार) तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्या उपस्थितीत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

शेतकरी संघटनांनी केलेल्या दुध दरातील तफावतीसह अन्य मागण्यांसाठी आज तहसील कार्यालयात बैठक झाली. तहसीलदार श्री. शेळके, निवासी नायब तहसीलदार अजित कुऱ्हाडे, महाकाली दुध संघाच्यावतीने सुनिल पाटील, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्यासह कोयना दुध संघ, हुतात्मा दुध संघाचे प्रतिनिधी, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, साजीद मुल्ला, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, विश्वासराव जाधव, इंद्रजीत जाधव, विक्रम थोरात, उत्तमराव खबाले, पोपट जाधव, प्रकाश पाटील, अनिल घराळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: satara news karad milk minimum and to set up the squad