क्लिष्ट खुनाचा आठ तासांत लावला छडा, दोघे गजाआड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

कॉलेजमधील किरकोळ मारामारीतील खुन्नस काढण्यासाठी त्यांनी खून केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तापासात पुढे येत आहे.

कऱ्हाड : अत्यंत क्लिष्ट असलेल्या पार्ले येथे झालेल्या युवकाच्या खुनाचा अवघ्या आठ तासांत तपास करून पोलिसांनी चौघा जणांची नावे निष्पन्न केली आहेत. पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे व पोलिस निरिक्षक अशोक क्षीरसागर यांनी समन्वयातून गुन्हाचा छडा लावला. त्यातील दोघांना अटक झाली आहे. अन्य दोघेजण अल्पवयीन आहेत.

कॉलेजवरील किरकोळ मारामारीतील खुन्नस काढण्यासाठी त्यांनी खून केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तापासात पुढे येत आहे. प्रथमेश संजय संकपाळ (वय 18 रा. विहे, ता. पाटण) असे संबधित युवकाचे नाव आहे. चिन्मय प्रशांत जगताप (19, वडगाव हवेली) व विजय बाळू माने (19, रा. शिरवडे - रेल्वेस्टेशन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासाची दखल घेवून पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी तपास करणाऱ्या अधिकारी व पोलिसांना पंधरा हजरांचे बक्षीस जाहीर केले आहे. 

पोलिस उपाधीक्षक ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशोत्सवाच्या दरम्यान चिन्मय जगताप व त्याच्या सोबतचे दोघे येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. चौथा संथयीत विजय माने वेणूताई चव्हाण महाविद्यालयात आहे. तर मृत प्रथमेश संकपाळही वेणूताई चव्हाण महाविद्यालयात शिकतो आहे. चिन्मय व प्रथमेश या दोघांच्या गटात गणेशोत्सेवाच्या दरम्यान मारामारी झाली होती. त्यानंतर किमान तीनवेळा दोन्ही गटाने एकमेकांना मारहाण केली होती. चिन्मयच्या गटाचा पहिला खटका उडाला तो तारूख येथील युवकांसोबत. त्यांच्या सोबत प्रथमेश होता, ती मारामामारी केवळ खून्नस देण्यावरून झाली होती. त्यानंतर किमान तीन ते चारवेळा दोन्ही गटांनी एकमेकांना नेहमीच मारहाण केली. त्यांच्या एकमेकांना मारण्याचा सिलसिला सुरूच होता. त्यातून शेवटची मारामारी दिवाळीच्या परीक्षा संपण्यापूर्वी झाली होती. त्यानंतर मात्र मारामारी झाली नाही. कॉलेजवर चिनम्य जगताप याची दहशत आहे. त्याच्याशी वाद झाल्याने तारूखचा विद्यार्थी कॉलेजला येत नव्हता. तो चिन्मयला घाबरायचा. प्रथमेश त्याला चिन्मय काय डॉन आहे काय, तो काय करत नाही, असे सांगून तो त्याला कॉलेजला यायला भाग पाडत होता. ती गोष्ट चिन्मयपर्यंत समजत होती. त्यातून प्रथमेशबद्दलचा द्वेष चिन्मयच्या मनात साठला. तारूखच्या त्या युवकाला मारण्यापेक्षा त्याला चिथवणाऱ्या प्रथमेश काटा काढण्याचेही प्लनिंग चिन्मयने केले. त्याच प्लनिंगमधून त्याचा खून करण्यात आला आहे. 

दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर पुन्हा कॉलेज सुरू झाले. त्यावेळी त्यांनी कोणालाही काहीही केले नाही. 17 नोव्हेंबरला वेणूताईच्या महाविदद्यालयाच्या परिक्षा होत्या. परिक्षावेळी प्रथमेश काटा काढण्याचे त्यांनी निश्चित केले. चिन्मय येथे होस्टेलला राहत होता. विजय माने शिरवडेहून ये-जा करत होता. खून झालेला प्रथमेश विह्यातून ये-जा करत असे, प्रथमेशचा काटा काढण्यासाठी चिन्मय, विजयसह त्यांच्या सोबतचे दोन अल्पवयीन विद्यार्थी 17 नोव्हेंबरपूर्वी तीन दिवस आधी चिन्मयच्या होस्टेलच्या खोलीत बसले. तेथे त्यांनी कट रचला. त्यानंतर 16 नोंव्हेबरलाही त्यांनी पु्न्हा खून कसा करायचा, याचे प्लनिंग केले. त्यानंतर त्यांनी बाजारात जावून चाकू, सत्तूर व अन्य हत्यारे आणली.

वेणूताई चव्हाण महाविद्यालयात परिक्षा सुरू होत्या. त्या दुपारी अडीच वाजता संपल्या. त्यावेळी प्रथमेश बाहेर आला. त्यापूर्वीच चिन्मय जगताप, विजय माने व त्याचे दोन साथीदार त्यांची वाट पाहत बाहेर थांबले होते. त्यांनी जबरदस्तीने त्यांना दुचाकीवर बसवले. त्यांना पार्ले येथील रानातून रेल्वे स्टेशनकडे नेले. तेथे दोघांनी प्रथमेशचे हात धरले. दोघांनी त्याच्या मान, पाट व डोक्यावर वार केले. ते वार वर्मी लागल्याने प्रथमेश जागीच कोसळला. त्याचा मृतदेह तेथेच टाकून चोघेही पसार झाले. त्यावेळी चिन्मय व त्याचा अन्य अल्पवयीन साथीदार पुण्याला गेले. विजय माने व त्याच्या सोबतचा दुसरा अल्पवयीन अन्य गावी गेले. दुसऱ्या दिवशी पोलिसांना प्रथमेशचा मृतदेह सापडला. त्याच दिवशी सकाळी प्रथमेशचे आईवडील पोलिस ठाण्यात तो बपेत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी आले होते. मात्र त्यांना मुलाचा खून झाल्याची माहिती समजली. पोलिसांना घटनास्थळी प्रथमेशचे आयकार्ड सापडल्याने त्याची ओळख पटली होती. 

पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या आठ तासात त्याची माहिती काढून तपासाचा छ़डा लावला. चिन्मयसह त्याच्या मित्रांनी प्रथमेशला घेवून गेल्याचे पाहणारे साक्षीदार पोलिसांना मिळाले अन् तेथून गुन्ह्याची साखळी उलगडत गेली. त्यात गणेशोत्सवापासून त्यांच्यात झालेली मारामारीची सगळी हकीकीत संशयीतांना पोलिसाकडे कबूल केली. त्यावेळी प्रथमेशला संपवण्याच्या हेतूनेच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. 

Web Title: satara news karad murder traced in eight hours