कोयना धरण परिसरात 10 मिलीमीटर पाऊस, पाणीसाठा 88.75 TMC

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप कमी जास्त पाऊस होत आहे.

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणी साठ्यात चोवीस तासांत ०.२१ टीएमसीने वाढ झाली. कोयना धरणाचा पाणी साठा ८८.७५ टीएमसी झाला आहे.

काल पाणीसाठा ८८.५४ टीएमसी होता. कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप कमी जास्त पाऊस होत आहे. काल कोयनेत दिवसभरात दहा मिलीमीटर पाऊस झाला.

धरणाच्या पाण्याची उंची २१५०.०८ फुट आहे. चोवीस तासांत कोयनानगरला १० (३४९९), नवजाला १३ (३९८४) व महाबळेश्र्वरला ५ (३३९२) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: satara news karad news koyna dam storage rains