'तासात परवाना देण्याचा कऱ्हाड पॅटर्न राज्याने स्विकारला'

हेमंत पवार
बुधवार, 24 जानेवारी 2018

कऱ्हाड (सातारा): एका तासात शिकावू परवाना देण्याची कार्यवाही करण्याचा कऱ्हाड पॅटर्न राज्याच्या परिवहन विभागाने स्विकारल्याने लोकांची चांगली सोय झाली आहे. ब्रेक टेस्ट ट्रक असणारे सांगली व सातारा विभागातील कऱ्हाड हे एकमेव कार्यालय आहे. कार्यालयाने डेली झीरो पेंडन्सी हा नवीन पॅटर्न सुरु करुन दररोज त्याची अंमलबजावणी सुरु केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.

कऱ्हाड (सातारा): एका तासात शिकावू परवाना देण्याची कार्यवाही करण्याचा कऱ्हाड पॅटर्न राज्याच्या परिवहन विभागाने स्विकारल्याने लोकांची चांगली सोय झाली आहे. ब्रेक टेस्ट ट्रक असणारे सांगली व सातारा विभागातील कऱ्हाड हे एकमेव कार्यालय आहे. कार्यालयाने डेली झीरो पेंडन्सी हा नवीन पॅटर्न सुरु करुन दररोज त्याची अंमलबजावणी सुरु केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.

आरटीओ कार्यालयाने राबवलेल्या विविध नाविन्यपुर्ण उपक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मोटर वाहन निरीक्षक आकाश गालिंदे, निता शिबे, जनसंपर्क अधिकारी निळकंठ पाटील उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, एका तासात शिकावू परवाना देण्याचे शिवधनुष्य आम्ही उचलून पेलले आहे. राज्यासाठी एक मॉडेल ठरलेला हा कऱ्हाड पॅटर्न राज्याच्या परिवहन निभागाने स्विकारला असून त्याची अन्य कार्यालयात कार्यवाही सुरु झाली आहे. त्यामुळे लोकांची चांगली सोय झाली आहे. सारथी ४ ही ऑनलाईन प्रक्रीया कार्यालयाने स्विकारली असून त्यामुळे वाहनांची ऑनलाईन तपासणी सुरु केली आहे. सातारा, सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच कऱ्हाड कार्यालयात ब्रेक टेस्ट ट्रक सुरु करण्यात आला आहे. त्याद्वारे वाहनांची चाचणी घेण्यात येत आहे. कऱ्हाड कार्यालयाने डेली झीरो पेडन्सी हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. त्याचा प्रारंभ दसऱ्यादिवशी केला. एकाच दिवशी गाडी खरेदी, एकाच दिवशी पासिंग आणि एकाच दिवशी अनेक गाड्यांना नंबर दिले. त्याद्वारे नवीन गाड्या घेतलेल्यांची तपासणी व पासिंग करुन त्यांना सायंकाळी नंबरही देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तांत्रिक दोषांचा अपवाद वगळता ही प्रणाली चांगल्या पध्दतीने दररोज सुरु आहे. हाही एक अभिनव पॅटर्न कऱ्हाड कार्यालयाने सुरु केला आहे. गेल्या २० वर्षापासून रिक्षांची परमिट दिलेली नव्हती. ती देण्याची कार्यवाही आम्ही १ ते ३ दिवसात पुर्ण केली. केवळ पाचशे रुपयांत त्यांना इरादापत्रे दिली. कऱ्हाड कार्यालयाने आयएसओ मानांकनाची सर्व पुर्तता केल्याने कार्यालय त्यासाठी पात्र ठरले आहे. मात्र ते स्विकारण्याबाबत सरकारकडुन परवानगी मागितली आहे. कऱ्हाड कार्यालयाचे 35 कोटींचे उदिष्ठ आहे. सध्या 32 कोटींचे उदिष्ठ पुर्ण झाले असुन मार्चपर्यंत ते 100 टक्यांवर जाईल असाही विश्वास श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.   

१५ वर्षावरील वाहने तपासा
१५ वर्षावरील वाहने तपासून त्याचे फीटनेस प्रमाणपत्र आरटीओ कार्यालयाकडून घेणे शासनाने बंधनारक केला आहे. ज्यांची वाहने १५ वर्षावरील आहेत त्यांनी ती तपासून पर्यावरण कर भरुन नियमीत करुन घ्यावी. ज्यांनी ती १५ वर्षानंतर तपासली नाही त्यांचा दरवर्षी पर्यावरण कर वाढत असून, संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

Web Title: satara news karad patern rto learning licence