साताराः कऱ्हाड पोलिसांचा स्वंयघोषीत कौतुकाचा फुगा फुटला...

file photo
file photo

कऱ्हाड (सातारा): शहरात मटका चालत नाही, मटका बंद आहे, असा निर्वाळा शहर पोलिसांनी काही दिवसापूर्वी दिली होता. मात्र पोलिसांचाच निर्वाळा पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या कारवाईने खोटा ठरल्याचे उघड झाले आहे. शहरातील पोस्टल कॉलनीत चालणारा मटक्याच्या मुख्य बुकीचा अड्डा त्यांनी छापा टाकून उद्धवस्थ केले. तेथे काम करणाऱ्या आठ जणांना रोख रक्कम व त्यांच्याकडील दीड लाखाच्या साहित्यासह अटक झाली. त्यामुळे शहर पोलिसांच्या स्वंयघोषीत कौतुकाचा फुगाच फुटल्याचे कारवाईतून पुढे आले आहे. तब्बल नऊ वर्षानंतर झालेल्या मटका बुक्कीच्या मुख्य कार्यालयावरील धाडसी कारवाईत सातत्य राहण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा ये रे माझ्या मागल्या सारखी अवस्था होण्याची शक्यता आहे.

शहरासह तालुक्यात मचटाक ओपन आहे, मात्र तो छुप्या पद्धतीने चालतो आहे. मात्र, शहरासह तालु्क्यात मटका चालतो का, अशी विचारणा केली तर पोलिस थेट नाही, असे उत्तर देतात. कोणताही अवैध व्यवहार सुरू नाही, असा निर्वाळा देण्यासही पोलिस मागे पुढे पाहत नाहीत. मात्र, त्याच पोलिसांचा निर्वाळ किती खोटा आङे, याची जाणीव काल सायंकाळी पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांनी केलेल्या कारवाईत उघड झाले. त्यांच्या पथकाने मटक्याच्या मुख्य बुक्कीच्या अड्ड्यावर चापा टाकला. येथील पोस्टल कॉलनीत तो अड्डा सुरू होती. त्याची माहिती घेण्याचे काम पोलिस उपाधीक्षक चार दिवसांपासून करत होते. मात्र प्रत्यक्षात तेथे मटाक घेण्य़ाचे व व्यवहाराचे काम सुरू असताना कारवाई करण्याचा त्यांचा मानस होता. त्याप्रमाणे काल त्यांनी त्या कार्यालयावर चापा टाकला. त्यात थो़डे थो़डके नव्हेत तर सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात आठजमांना अटक आहे. आठ माबाईल, तीन दुचाकीसह त्यांच्या खेळातील रोख 25 हजार रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आह. कऱ्हाडला सुमारे नऊ वर्षानंतर अशी धाडसी कारवाई झाली आहे. यापूर्वी तत्कालीन पोलिस उपाधीक्षक मनोज पाटील व पोलिस निरिक्षक महादेवराव गावडे यांनी संयुक्तपणे कारवाई केली होती. त्यात सलग आठ दिवसात सहा मटका बुक्कीची सहा कार्यालये पोलिसांनी उद्धवस्थ केली होती. त्यात लाखो रूपायांचा एवजासह सुमारे तीस लोकांना अठक झाली होती. साखळी पद्दतीने कारवाईची जिल्ह्यातील पहिलीच त्यावेळची वेल होती. त्यांचा कालावधी संपपर्यत कऱ्हाडला पुन्हा मटाक काही ओपन झाला नव्हता. त्यां कारवाईनंतर पुन्हा एकदा पोलिस उपाधीक्षकांच्या कारवाईने अवैध व्यवसायिकांना हादरवले आहे.

शहरात मटका चालत होता. मात्र ज्या ज्या वेळी त्याबाबतीच विचारणा केली जायची, त्या त्या पोलिस नॉमिनल कारवाई दाखवून तो विषय माररून पुडे नेताना दिसत होते. त्यामागे अर्थपूर्ण व्यवहाराची सांगड होती, हेही अनेकदा स्पष्ट झाले आहे. मात्र त्याबाबत कोणीच काहीही बोलत नसे. कारवाईची वेळ आली की, पोलिस थेट मटका बुक्कीला कॉल करून एक माणूस दे, कारवाई दाखवायची आहे, असे म्हणत कागदोपत्री कारवाईचे नाटक करून त्याचा गाजावाजा करताना दिसत होते. त्यामुळे मुल मटका चालूच राहत होता, त्याच्यावर कोणाचेच नियंत्रण नव्हते, असे स्थिती होती. त्यामुळे कालच्या पोलिस उपाधीक्षकांच्या थेट कारवाईने अवैध व्यवसायिक हादरले आहेत. सेटलमेंट करमाऱ्या पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईचा आग्रह धरणारांना बळ मिळाले आहे. त्यामुळे पोलिसांची कागदोपत्री कारवाईचा निर्वाळा आता येथून पुडे पार काळ चालेले असे दिसत नाही. मात्र त्यासाठी पोलिस उपाधीक्षकांच्या कारवाईत दाडसीपणा कायम टिकण्याची गरज आहे. त्यासाठीही वेगळा आराखडा अपेक्षीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com